Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

येत्या २६ डिसेंबरला दुर्मिळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी

Share

नाशिक : दक्षिण भारतातून २६ डिसेंबर २०१९ रोजी कंकणाकृती सुर्यग्रहण दिसणार आहे. दक्षिण भारतातील कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यात कंकणाकृती सुर्यग्रहण दिसणार असुन महाराष्ट्र सह उर्वरित भारतात मात्र खंडग्रास सुर्यग्रहण दिसणार आहे. सूर्यग्रहण ही एक दुर्मिळ व विस्मयकारक खगोलीय घटना आहे यामुळे सूर्यग्रहण पाहण्याची दुर्मिळ संधी गमावू नका असे आवाहन औरंगाबाद येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केले आहे.

साधारण दहा वर्षांनी भारतातून दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहण्याकरिता नागरिकांना प्रोत्साहित करा असेही आवाहन औंधकर यांनी केले आहे.

कोणत्या ठिकाणाहून पाहाल?
ग्रहण पाहण्यासाठी आपल्या जवळ पूर्वेकडील खुले आकाश असलेली मोकळी जागा निवडा.

सुरक्षितपणे ग्रहण कसे पाहाल ?
अनेकदा सूर्यग्रहण बघण्यासाठी लोक चष्म्याचा वापर करतात. परंतु ते चुकीचे असते. सूर्य आणि सूर्यग्रहण पाहण्यासाठी खास तयार करण्यात आलेले “ग्रहण चष्मे” वापरा. यासाठी अमेरिकेतील ‘Thousand Oaks’ या कंपनीने खास संशोधन करून तयार केलेले ‘ग्रहण चष्मे’ पाहण्यासाठी वापरा. त्यातून सूर्याकडून येणारी घातक अतिनील किरणे रोखली जातात.

‘पहा-पेरा-वाचवा’ अभियान

निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन या ग्रहण चष्माच्या किट मध्ये पाच भारतीय वृक्ष प्रजातींच्या बिया असणार आहेत. म्हणजे ग्रहण तर पहायचेच, सोबत बिया ही पेरायच्या व यातुन आपल्या धरतीमातेचे संवर्धन करायचे, अशा ‘पहा-पेरा-वाचवा’ या आगळ्यावेगळ्या अभियानात सहभागी व्हा असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!