Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

देवळा : निंबोळे येथे शेतकऱ्यांची टॅबलेटवर ऑनलाईन परीक्षा

Share

वासोळ : गेल्या चार महिन्यापासून चालत असलेल्या केंद्र सरकार मार्फत राबविला जाणारा कृषिविषयक प्रकल्प प्रधानमंत्री शेतकरी कौशल्य विकास योजना व छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता अभियान या कार्यक्रमांतर्गत निंबोळे तालुका देवळा येथे तीन दिवसीय प्रशिक्षण व ८ आठवड्याचा जोड कार्यक्रम राबविण्यात आला.

तीन दिवसीय प्रशिक्षण ८आठवड्याचा जोड कार्यक्रम झाल्यानंतर शेतकऱ्याची ऑनलाइन परीक्षा हे योजनेचे शेवटचे स्वरूप असताना निंबोळे येथील शेतकऱ्यांनी टॅबलेटवर मोठ्या कुतूहलाने ऑनलाइन परीक्षा दिली शेतकऱ्यांचा ऑनलाइन परीक्षेला उत्तम प्रतिसाद मिळाला महिला शेतकऱ्यांनी देखील मनात भीती न बाळगता मोठ्या नवलाईने टॅबलेट हातात घेऊन ऑनलाइन परीक्षा दिली.

अतिशय मोठ्या कुतूहलाने शेतकरी या परीक्षेला सामोरे गेले जीवनात कधी न बघितलेली ऑनलाइन परीक्षा शेतकर्‍यांना या योजनेमार्फत अनुभवायला मिळाली शेतकऱ्यांना प्रशिक्षणावर आधारित असलेले प्रश्नोत्तर सोडवण्यात काहीही अडचण आली नाही. गावात प्रधानमंत्री शेतकरी कौशल्य विकास योजना पुन्हा राबवण्यात यावी यासाठी शेतकरी आग्रही आहेत.

शेतकरी बांधवांना केंद्र शासन प्रमाणित प्रशिक्षक व कृषी विषयात पदवी धारण केलेले प्रशिक्षक सचिन ईल्लरकर, शरद पोफळे,अनिल कळसाईत आदींचे अनमोल मार्गदर्शन लाभले यावेळी मेशी गट समन्वयक विशाल मराठे, वासोळ गट समन्वयक वैभव केदारे,कुणाल शिरसाठ,ज्ञानेश्वर चव्हाण आदींनी परीक्षा यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!