Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शंभर मतदान केंद्र वाढणार

Share

नाशिक । प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात २ लाख १० हजार मतदारांची भर पडली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्ंया पार्श्वभूमीवर राबविण्यात आलेल्या नाव नोंदणी मोहिमेमुळे मतदारांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे लोकसभेच्या तुलनेत मतदान केद्रांची संख्या वाढणार आहे. जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघात ४ हजार ८२० मतदान के्ंरदावर मतदान प्रक्रिया यंदा पार पडेल.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम येत्या १५ सप्टेंबरला जाहीर होऊन आचार संहिता लागू होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानूसा जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार यादया शुध्दीकरणाचे काम सुरु आहे. येत्या ३१ ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

शहरी भागातील मतदान केंद्रासाठी १४०० तर ग्रामीण भागातील केंद्रासाठी १२०० मतदारांची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा अधिकचे मतदार असल्यास नवीन केंद्र निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. निवडणूक शाखेने जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील ४ हजार ४४६ सर्वेक्षण केले. त्यांनतर आयोगाच्या निदेर्शानूसार राबविण्यात आलेल्या मतदान नोंदणी मोहीमेत २ लाख १० हजार नवमतदारांची भर पडली होती. यात ६० हजार नवमतदारांची नोंद करण्यात आली होती. आता विधानसभा निवडणुकीतही मतदार नोंदणी मोहीमेमुळे नवमतदार संख्येत वाढ झाली आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मतदान केंद्रांची पुनर्रचना करण्यात आली त्याच धर्तीवर विधानसभा निवडणुकीत देखील पुनर्रचना केली जाणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या १०० ने वाढण्याची शक्यता आहे. शहरी भागात १४०० व ग्रामिण भागात १२०० च्या वर एका मतदान केंद्रावर मतदान जावू नये हा नियम निवडणूक विभागाने लावला आहे. त्यामुळे वाढीव मतदारांचा विचार करता मतदान केंद्राची संख्या आता ४ हजार ७८० वरुन ४ हजार ८२० होण्याची शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!