जिल्हास्तरीय रोलर स्पिड स्केटींगमध्ये ओमला गोल्डमेडल

0

नाशिक | नाशिक जिल्हा रोलर स्केटींग आसोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या विद्यमाने पार पडलेल्या जिल्हास्तरीय रोलर स्पिड स्केटींग स्पर्धेत बाल गटातून ओम सुनिल खोले याने सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

श्रध्दा लॉन्स, मखमलाबाद रोड, पंचवटी येथे गोदा श्रध्दा फाऊंडेशन व विनय स्पिड स्केटींग क्लब नाशिक च्यावतीने आयोजित तिसर्‍या जिल्हास्तरीय ओपन रोलर स्पिड स्केटींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील ६०० स्पर्धक यावेळी सहभागी झाले होते. लहान मुलांच्या ८ गटात व १३ वर्षावरील वरिष्ठ गटात स्वतंत्रपणे ही स्पर्धा खेळविण्यात आली.

९ ते ११ वयोगटात जे.डी.सी. बिटको प्राथमिक विद्या मंदिरचा ओम सुनिल खोले याने युनिक क्लबचे प्रतिनिधीत्व करत स्कॉड स्केच प्रकारात ५०० मीटर अंतर पार करुन त्याने सुवर्णपदक पटकावले.

गोदा श्रध्दा फाऊंडेशनच्या अध्यक्ष सुरेश पाटील, एनडीआरएसएच्या अध्यक्षा वैशाली टिळे, सेक्रेटरी सविता बुलंगे, विनय क्लबचे विनय नकवाल यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचा सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

*