नाशिकच्या नुपूरची आशियाई ज्युनियर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

0
नाशिक | नाशिक शहरातील फ्रावशी अॅकेडमीची टेनिस खेळाडू नुपूर गुप्ता हिने १४ वर्षाखालील आशियाई ज्युनियर स्पर्धेत नाविन्यपूर्ण कामगिरी केली.

छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे गेल्या आठवड्यात ही स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत नुपूरने उत्तम खेळाचे प्रदर्शन करत ८ वा क्रमांक मिळवला.

१३ वर्षीय नुपूर याआधी चार वेळा राष्ट्रीय पातळीवर टेनिस खेळली आहे. तसेच तिने गेल्या आठवड्यात रायपुर येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धेत तिने सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरीचे प्रदर्शन करत एकेरी स्पर्धेत आठवी श्रेणी संपादन केली तर दुहेरी प्रकारात तिने तिसरा क्रमांक मिळवला.

फ्रावशीचे संचालक रतन लथ, शर्वरी लथ नुपूरचे कौतुक करताना

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे नाशिकमध्ये आले होते तेव्हा त्यांनी नुपुरचे अभिनंदन केले. त्यानंतर नुपूर स्पर्धेला रवाना होण्याआधी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.

दरम्यान, तिच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल फ्रावशी अॅकेडमीचे संचालक रतन लथ, शर्वरी लथ यांच्यासह तिचे अनेक स्तरातून कौतुक केले जात आहे.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासमवेत नुपूर गुप्ता

विशेष म्हणजे नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांना आयरन मॅन बनविण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली ते प्रशिक्षक मुस्तफा टोपीवाला यांचे नुपुरला मार्गदर्शन लाभले होते.

LEAVE A REPLY

*