Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

वाहतुकीचे नियम मोडल्यास आता तिप्पट दंड; १ सप्टेंबरपासून होणार पाच मोठे बदल.

Share

नाशिक । प्रतिनिधी : पुढील महिन्यात दि.१ सप्टेंबरपासून देशामध्ये अनेक आर्थिक व्यवहारांशी संबंधित नवे नियम लागू होणार आहेत. यातील काही बदल दिलासादायक असले तरी काही बदलांमुळे जनतेच्या खिशावर ताण पडणार आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यास आता दुप्पट आणि तिप्पट दंड भरावा लागणार असून दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे कर्ज मात्र स्वस्त होणार आहे. ज्याचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे.

पुढील महिन्यापासून वाहतुकीचे नियम बदलणार आहेत. त्यामुळे आपल्याला रस्ते वाहतुकीचा एखादा नियम मोडल्यास जास्त दंड द्यावा लागेल. दि.०१ सप्टेंबरपासून मोटर वाहन (संशोधन) अधिनियमात ६३ उपनियम लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता दारू पिऊन गाडी चालवणे, ओव्हरस्पीड, ओव्हरलोडिंगचा प्रयत्न झाल्यास दुप्पट- तिप्पट दंड द्यावा लागणार आहे.

जुने कर चुकवण्यासाठी सरकारने नवी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत कर चुकवणे सोपे होणार आहे. ही योजना दि.०१ सप्टेंबर रोजी सुरू होणार असून दि. ३१ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या योजनेंतर्गत राहिलेला कर भरता येणार आहे. योजनेंतर्गत शिल्लक कर चुकवल्यास कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. यात कर चुकवल्यास व्याज, पेनल्टीमधून सूट देखील मिळणार आहे. ५० लाखांच्या करावर ७० टक्के, ५० लाखांहून जास्तीच्या करावर ५० टक्के करातून सूट या योजनेतून मिळणार आहे.

वाहनाचे नुकसान झाल्यास तात्काळ विमा….

विमा कंपन्या आता वाहनांचे भूकंप, पूर आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसान, गाड्यांची तोडफोड झाल्यास वेगळ्या प्रकारचं विमा संरक्षण कवच पुरवणार आहेत. या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळणार आहे.

SBI च्या ग्राहकांसाठी गृहकर्ज स्वस्त…
एसबीआयने गृह कर्जावरच्या व्याजदरात २.२० टक्के कपात केली आहे. दि.०१ सप्टेंबरपासून वाहन कर्जावरील व्याजदर ८.०५ टक्के होणार आहेत. आरबीआयने या महिन्यात रेपो रेट कमी करून ५.४० टक्क्यांवर आणला आहे.

स्वास्थ्यासाठी हानिकारक उत्पादनांना इशारा..

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानने तंबाखूजन्य उत्पादनांवरच्या बंदीसाठी नवी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन नियम २००८ मध्ये बदल करण्यात आले आहेत. हे नवीन नियम दि.०१ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!