श्वान निर्बिजीकरण प्रकरणी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोनवणेंवर कारवाई

0

नाशिक । दि.12 प्रतिनिधी

शहरात श्वान निर्बिजीकरणाचे काम शासन निर्णयानुसार न करणे, वराह व मोकाट जनावरांवरील कारवाईसंदर्भात गंभीर नसणे, उघड्यावर मांस विक्रीवर कारवाई न करणे, सभेत चुकीची माहिती देणे अशाप्रकारे कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत आज पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आज महापालिका स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या आठवड्यात निर्बिजीकरणाच्या ठेक्यास मंजुरी दिल्यानंतर आज पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजावर अनेक सदस्यांनी आक्षेप घेतल्यानंनतर सभापतींनी ही कारवाई केली.

महापालिका स्थायी समिती सभेची सहावी सभा आज सभापती हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विषयपत्रिकेवरील पहिला विषय कार्यवृत्त कायम करण्यासंदर्भातील विषयांवर झालेल्या चर्चेत पशुसंवर्धन विभागाच्या निर्बिजीकरणाच्या विषयावर जोरदार चर्चा झाली.

( स्थायी समितीत या विषयावर काय चर्चा झाली? डॉ सोनवणेंनी सदस्यांच्या प्रश्नांवर काय उत्तरे दिली? हे सविस्तर वाचा उद्याचा दैनिक देशदूतच्या अंकात. आपला अंक आजच राखून ठेवा.)

LEAVE A REPLY

*