Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : मेनरोडवरील महापालिकेच्या दगडी इमारतीचा काही भाग कोसळला; परिसरात भीती

Share

जुने नाशिक | वार्ताहर 

शहरातील मेनरोड येथील ब्रिटीशकालीन असलेल्या जुनी महापालिका इमारतीचा काही भाग कोसळल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस आणि महापालिकेचे कर्मचारी दाखल झाले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे  इमारतीच्या जिजाऊ अभ्यासिकेकडच्या भागात असलेल्या दगडी भींतीला तडा गेला होता. यानंतर सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आज दुपारी दुपारी उंचावरून काही दगड खाली कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

मागील भिंतीला उभा तडा गेल्याने इमारतीचा काही भाग ढासळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिसांची कुमक, आपत्ती व्यवस्थापन पथकासह महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची गर्दी झाल्यानंतर परिसरातील बघ्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली आहे.

महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन इमारत दगडी वास्तू म्हणून परिचित आहे. याठिकाणी अजूनही पूर्व विभागाचे काम चालते. गेल्या काही दिवसांपूर्वीच इमारत धोकेदायक ठरवली होती. दरम्यानच्या काळात मात्र, प्रशासनाकडून इमारतीच्या देखभालीसाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे इमारतीवर आजही लहानमोठे वृक्ष उगवलेले दिसून येतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!