Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

महापौर-उपमहापौरपद : अर्ज दाखलसाठी आज अखेरचा दिवस

Share

 नाशिक । भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी तयार झालेली महाशिवआघाडी आणि फुटीच्या शक्यतेनंतरही सत्ता टिकवण्यासाठी भाजपकडून केल्या जात असलेल्या व्यूहरचनेमुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आज उमेदवारी अर्ज वितरणाच्या तिसर्‍या दिवशी भाजपकडून 9 नगरसेवकांनी आणि महाशिवआघाडीकडून 6 नगरसेवकांनी अर्ज घेतले. उद्या बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज नगरसचिव विभागात स्वीकारले जाणार असल्याने आजच सत्ताधारी व महाशिवआघाडीच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे.

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापौरपदासाठी एकूण 15 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत, तर उपमहापौरपदासाठी एकूण 15 इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 2 वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे. यामुळे सकाळच्या सत्रात आणखी अर्ज वाढण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज व छाननी, माघारीची प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे सभागृहात 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर करणार आहेत.

राज्यात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व अपक्षांना सोबत घेत महाशिवआघाडीचा प्रयोग सुरू आहे. असाच प्रयोग नाशिक महापालिकेत आता शिवसेनेकडून सुरू झाला असून रा.काँ. व काँग्रेस यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. फक्त मनसेनेने आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली असून यासंदर्भात अंतिम निर्णय मनसेनाप्रमुख राज ठाकरे हे उद्या बुधवारी किंवा गुरुवारी घेण्याची शक्यता आहे.

या संपूर्ण घडामोडींना आता वेग आला आहे. सत्ताधारी पक्षाचे 8 नगरसेवक संपर्क क्षेत्राबाहेर असल्याने भाजप नेत्यांकडून विरोधकांच्या गटात असलेल्या नगरसेवकांशी गुप्त संपर्क सुरू केला आहे. सत्ताधारी व विरोधकांकडून घोडेबाजार सुरू असल्याची चर्चा आहे.

महापौर-उपमहापौरपदासाठी दाखल अर्ज

महापौर पदासाठी : दिनकर पाटील, शिवाजी गांगुर्डे, कमलेश बोडके, अरुण पवार, गणेश गिते, स्वाती भामरे, प्रियंका घाटे, भिकूबाई बागुल, दिनकर आढाव (सर्व भाजप). अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, विलास शिंदे (सर्व शिवसेना). शाहू खैरे (काँग्रेस). सुफियान जीन (राष्ट्रवादी काँग्रेस). उपमहापौर पदासाठी : कमलेश बोडके, सुप्रिया खोडे, गणेश गिते, सुनीता पिंगळे, प्रियंका घाटे, विशाल संगमनेरे, भिकूबाई बागुल (सर्व भाजप). शाहू खैरे, डॉ. हेमलता पाटील (काँग्रेस). शोभा साबळे, सुषमा पगारे, सुफियान जीन, समीना मेमन (राष्ट्रवादी काँग्रेस). सलीम शेख (मनसेना) व विमल पाटील (अपक्ष).

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!