Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पूर्व विभागाचे विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर निलंबित

Share

नाशिक : मनपाच्या पश्‍चिम विभागाचे विभागिय अधिकारी यांनी होर्डींग विरोधात बेकायदेशिर कारवाई केल्या प्रकरणी सर्व पक्षिय नगरसेवकांच्या मागणीवरुन रवींद्र धारणकर यांना महासभेतून निलंबीत करण्यात आले आहे.

नाशिक पूर्व विभागाचे विभागिय अधिकारी रवींद्र धारणकर यांनी रमझान इदच्या काळात लावलेल्या होर्डींग विरोधात सतिश नाना सोनवणे, सतिश कुलकर्णी रुपाली निकुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

या पार्श्‍वभूमीवर काल महासभेत तिव्र पडसाद उमटले यासाठी सर्व पक्षिय नगरसेवकांनी मनपा आयुक्तांसह प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी सर्व पक्षिय नगरसेवकांनी धारणकरांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी लावून धरली.

याबाबत मनपा आयुक्तांना जाब विचारण्यात आला असताना या कारवाईबाबत आपणास कोणतीच सूचना देण्यात आलेली नसून, ती कारवाई परस्पर करण्यात आली असल्याचे सांगितले.

आयुक्तांच्या या खुलाशानंतर सर्वच लोकप्रतिनिधी भयंकर संतप्त झाले. व त्यांनी धारणकर यांना तातडीने निलंबीत करण्याची मागणी केली. महापौर व आयुक्तांनी महासभेच्या निर्देशांनुसार धारणकर यांनी निलंबीत करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!