अखेर नाशिक मनपा स्वीकृत सदस्य निवडीला लागला मुहूर्त; हे आहेत पाच स्वीकृत नगरसेवक

0
नाशिक ।  अखेर नाशिक महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त लागला आहे. शिवसेनेकडून ऍड शामला दीक्षित, सुनील गोडसे तर भाजपकडून बाजीराव भागवत, प्रशांत जाधव व अजिंक्य साने यांची निवड झाली आहे. 

महापालिकेतील पाच स्वीकृत सदस्य नियुक्तीची घोषणा आज झालेल्या महासभेत करण्यात आली. गेल्या महिन्यात शिवसेनेने आपल्या दोन सदस्यांची नावे प्रशासनाला दिल्यानंतर भाजपनेही दोन आठवड्यापूर्वीच तिघा सदस्यांची नावे पाठवली होती.

त्यानंतर आज झालेल्या महासभेत स्वीकृत सदस्यांची घोषणा महापौर रंजना भानसी यांच्याकडुन करण्यात आली.

गेल्या आठ महिन्यांपासून स्वीकृत नगरसेवक पदाची नियुक्ती रखडली होती. नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणुक 2017 च्या निवडणुकीत सर्वाधिक जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली. मात्र त्यानंतर पक्षांतून 3 स्वीकृत पदे घेण्यासाठी पुढे आलेली इच्छुकांची गर्दी थोपविण्यात भाजपला नाकेनऊ आले होते.

स्वीकृत सदस्याकरिता प्रथम 138 इच्छुकांची संख्या होती. त्यानंतर मोठी चाळणी लावल्यानंतर पक्षश्रेष्ठींकडे 38 इच्छुकांची यादी पाठविण्यात आली. त्यातून भाजपचे अंतीम 3 नावांची निवड झाली.

भाजपच्या गोटात प्रशांत जाधव, बाजीराव भागवत व नीलेश बोरा यांच्या नावांची चर्चा होती. मात्र निलेश बोरा यांच्या नावाला कात्री लागली आणि त्यांच्या जागी अजिंक्य साने यांची वर्णी लागली.

दुसरीकडे शिवसेनेच्या कोट्यातील दोन जागांसाठी चार जणांचे अर्ज शिवसेनेने प्रशासनाकडे दाखल केले होते. यापैकी सुनील गोडसे व अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांची वर्णी लागली आहे.

स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्तीवरून गेल्या महासभेत शिवसेनेने गोंधळ घातला होता. त्यामुळे आजच्या महासभेत स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा करावीच लागणार होती.

स्वीकृत सदस्य नियुक्तीची घोषणा होणार 20 तारखेच्या महासभेत

LEAVE A REPLY

*