मुंबईनाक्याजवळील अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविली; द्वारका आणि इंदिरानगरमध्येही मोहीम

0

नाशिक (प्रतिनिधी) ता. ११ : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिक शहरातील अतिक्रमित धार्मिक स्थळे हटविण्याची मनपाची मोहीम आज सलग चौथ्या दिवशी सुरू आहे.

आज सकाळी मुंबई नाका परिसरातील भारतनगर येथील अतिक्रमणे हटविण्यात आली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

त्यानंतर दुपारी द्वारका आणि इंदिरानगर परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात येणार आहे.

दरम्यान काल ज्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आले त्याठिकाणच्या जागेवर मातीचा भराव टाकून त्याचे सपाटीकरण करण्याचे कामही महापालिकेतर्फे युद्धपातळीवर सुरू आहे.

आज उंटवाडी रस्त्यावरील संभाजी चौकाच्या कोपऱ्यावर अशाच पद्‌धतीने जमिनीचे सपाटीकरण करण्यात आले. लवकरच् या सर्व जागांवर डांबरीकरण करण्यात येणार असून वाहतूकीची कोंडी त्यामुळे टळणार आहे.

मोठ्या पोलिस बंदोबस्तात मल्हारखान परिसरातील अतिक्रमणे हटविली; पश्चिम विभागात आज मोहिम

 

अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यास प्रारंभ

LEAVE A REPLY

*