Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

फेब्रुवारीत धावणार महापालिकेच्या 50 सीएनजी बसेस

Share

नाशिक : महापालिकेच्या शहर बससेवेला मागील महिन्यात स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर अंमलबजावणीला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेने ब्रेक लागले आहे. असे असले तरी आचारसंहिता संपल्यानंतर ठेकेदार कंपन्यासोबत करारनामा होऊन पहिल्या टप्प्यात 40 – 50 सीएनजी बसेसद्वारे महापालिकेच्या शहर बससेवेचा शुभारंभ होईल, असे नियोजन महापालिका प्रशासनाकडून सुरू झाले आहे. दरम्यान पुढील वर्षात फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवण्यात प्रत्यक्ष बससेवा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

वार्षिक 20 कोटी रुपये खर्चात चालणार्‍या शहर बससेवेत टप्प्या टप्प्यात 200 सीएनजी, 150 इलेक्ट्रीक व 50 डिझेल बसेस शहरात धावणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मागील महिन्यात तीन ऑपरेटर कंपनीसोबत करार करण्यास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर यासंदर्भात अंमलबजावणीची तयारी केली जात असतानाच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाल्याने या कामाला ब्रेक लागला आहे.

आता चालु महिन्याअखेरीत आचारसंहिता संपल्यानंतर 15 नोव्हेंबरपर्यंत संबंधित ऑपरेटर कंपन्यासोबत करारनामा प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. यात सीएनजी व डिझेल बसेस पुरविणार्‍या ऑपरेटर कंंपनीला पहिल्या टप्प्यात बसेस पुरविण्यासाठी 90 दिवसाची मुदत देण्यात आली आहे. तर इलेक्ट्रीक बसेस पुरविणार्‍या ऑपरेटर कंपनीला बसेस सुरू करण्यासाठी 120 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

अशाप्रकारे ऑपरेटर कंपन्यांंना करारानंतर प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी देण्यात आलेली मुदत पाहता 15 फेबु्रवारी 2020 पर्यंत पहिल्या 40 सीएनजी व 10 डिझेल बसेसचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या शहरातील नियोजित बस डेपो, कार्यशाळा, आऊट सोर्सिंगद्वारे वाहक भरणे व अधिकारी भरणे आदीसह कामांच्या प्रक्रिया वेगात करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. अशाप्रकारे पहिल्या टप्प्यात सीएनजी व इलेक्ट्रीक बसेस आणून शहर बससेवेचा प्रारंभ करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू झाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!