Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

ठेकेदारांनो सावधान ! हलगर्जीपणा केल्यास भरावा लागणार लाख रुपयांचा दंड

Share

नाशिक : नव्या नियमामुळे वाहन धारक जेरीस आले असतांना आता ठेकेदारांना देखील भुर्दंड बसणार आहे. कारण रस्ता बनवताना केलेला घोळ ठेकेदारांना महागात पडू शकतो.

राज्यातील वाहनधारकांना जसा कायदा करण्यात आला तसाच कायदा आता रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांनाही आता दंड भरावा लागणार आहे. नुकतेच नितीन गडकरी यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे.

रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांनी रस्ते तयार करतांना रस्त्याची आराखडा चुकीचा केला किंवा खालच्या दर्जाचा साहित्य वापरले किंवा रस्ते देखरेखीमध्ये हलगर्जीपणा केला तर एक लाख रुपयांपर्यंतचा दंड बसणार आहे. त्यामुळे यापुढे रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांनाही चाप बसणार आहे.

 

दरम्यान काही दिवसांपूर्वी देशभरात मोटर व्हेइकल कायदा लागू करण्यात आला होता. यामुळे कुठल्याही नियमभंगासाठी पाचपट तर काही बाबतीत दहापट दंड आकारला जात होता. यामुळे अनके घटना पाहावयास मिळाल्या. यामध्ये वाहनधारकांना कमीत कमी एक हजार ते अगदी २५ हजार रुपयांपर्यंत दंड या नव्या कायद्यांतर्गत भरावा लागत होता. यामुळे राज्यातील वाहनधारक नव्या कायद्यामुळे त्रासून गेले होते. आता असाच कायदा हा रस्ते बनविणाऱ्या ठेकेदारांनाही लागू करण्यात येणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!