Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

प्रभावी कारवाईसाठी निर्भयाला मिळणार आठ स्पाय कॅमरे

Share

नाशिक । प्रतिनिधी
महिलांवरील अत्याचार, लैंगिक छळ, छेडछाड, महिलांविषयक गुन्हे नियंत्रित करण्यासाठी तसेच टवाळखोर गुन्हेगारांची मानसिकता बदलण्यााठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या पुढाकाराने अधुनिक स्वरूपात शहरात 10 निर्भया पथके तयार करण्यात आली आहेत. अधिक प्रभावी कारवाईसाठी या पथकांना लवकरच 8 स्पाय कॅमेरे उपलब्ध होणार आहेत.

फोन कॉल, मेसेज, ई-मेल, सोशल मीडियाचा वापर करून किंवा प्रत्यक्षरित्या महिलेची छेड काढली जाते, अशा वेळी महिलांना विनाविलंब पोलिसांची मदत उपलब्ध करून देऊन त्यांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, महिला, शाळकरी मुलींच्या छेडछाडीकडे होणारे दुर्लक्ष व त्यातून अपराध्यांचे वाढणारे बळ यांवर प्रभावी नियंत्रण आणणे, पुरुषांना विशेषत: तरुणांना त्यांच्या गैरवर्तनाची समुपदेशनातून जाणीव करून देणे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने त्यांना सुधारण्याची संधी देण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून अधुनीक स्वरूपात 10 निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.

7 जुनला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पथकांचे अनावरण करण्यात आले आहे. तसेच पोलिस कर्मचार्‍यांसाठी उपयुक्त असलेल्या एका मोबाईल अ‍ॅप्लिकेशनची सुरूवात करण्यात आली. या हेल्पलाईन क्रमांकासह निर्भया पथक एनएसके हे फेसबूक पेज सुरू करण्यात आले. या पेजवर महिला आपल्या तक्रारी मांडत आहेत. फेसबुकवरून आतापर्यत 8 महिलांनी तक्रारी केल्या आहेत.

या पथकातील अधिकारी व कर्मचारी साध्या वेशात पॅट्रोलींग करतील. यावेळी छेडाछाड व टवाळखोरी करणार्‍या संशयितांविरूद्ध थेट कारवाई करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रभावी काम करण्यासाठी निर्भया पथकातील कर्मचार्‍यांची संख्या वाढविण्यात आली आहे. परंतु कारवाई करताना पुराव्याच्या दृष्टीने टावळखोरांचे छायाचित्रण करण्याचा मुद्दा महत्वाचा आहे.

सध्या ही पथके आपल्या मोेबाईलद्वारे छायाचित्रण करत आहेत. परंतु मोबाईल दिसताच टवाळखोर पळ काढत आहेत. हे छायाचित्रण अधिक गुप्तपणे होण्यासाठी स्पाय कॅमेरांची आवश्यकता आहे. शहर पोलीस प्रशासनाने प्रथम 6 स्पाय कॅमेरे मागवले आहेत. येत्या दोन दिवसात हे कॅमेरे निर्भया पथकांच्या हाती मिळणार असून त्यांना अधिक प्रभावीपणे कामगिरी करण्यास मदत होणार आहे.

पुरावे मिळण्यास सुलभता
निर्भया पथकासाठी आठ स्पाय कॅमेरे उपलब्ध होत आहेत. हे कॅमेर्‍यांचा लवकरच वापर सुरू करण्यात येणार प्रत्येक पथकाला दोन कॅमेरे मिळणार आहे. या कॅमेर्‍यांचा वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण पथकातील महिला अधिकारी व कर्मचार्‍यांना यापूर्वीच देण्यात आलेले आहे. स्पाय कॅमेर्‍यामुळे टवाळखोरांच्या हालचाली सहजतेने आणि अगदी जवळून टिपल्या जातील. या व्हिडीओमुळे पुरावा देखील उपलब्ध होणार आहेत.
– भावना महाजन , निर्भया पथक, समन्वयक

550 हॉट स्पॉट
शहरातील मुली, महिलांची संख्या जास्त असणारे व छेडछाडीचे प्रकार होणारे 550 हॉटस्पॉटचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहेत. यामध्ये शहरातील महाविद्यालये, सर्वाजिक उद्याने, बसस्थानके, शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे या ठिकाणांवर ही पथके लक्ष केंद्रीत करणार आहेत. त्यांच्याकडे असणार्‍या छुप्या कॅमेरांद्वारे चित्रीकरण करण्यात येऊन भक्कम पुरावाही मिळवला जाणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!