Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निफाड : गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Share

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील कोठुरे येथील गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. करण विजय जाधव (वय १८) असे या युवकाचे नाव आहे.

रविवारी सकाळी नेहेमीप्रमाणे करण गावातील मित्र व नातेवाईक यांच्यासह पोहायला गेला होता. पोहत असताना पाठीला लावलेला गट्टू निसटल्याने बुडाला. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तरुण व नागरिकांनी शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला.

करण हा नि.सा.का.चे माजी संचालक बाळासाहेब माधवराव जाधव यांचा पुतण्या होता. त्याच्या निधनामुळे जाधव कुटुंबीय तसेच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!