Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निफाड : कादवा कारखान्याकडून शेतकऱ्यांची थकीत रक्कम मिळण्यासाठी ‘प्रहार’चा रास्ता रोको

Share

निफाड : कादवा गोदा साखर कारखान्याने निफाड परिसरातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांचे पैसे थकवल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथे रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान ही थकीत रक्कम देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच लवकरात लवकर मागणी मान्य करावी असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

तसेच राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली राजभवन घेराव आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार बच्चू कडू यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून आंदोलन गुंडाळले असल्याचे समजते.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!