Type to search

PhotoGallery : निफाडच्या पूर्व भागात पूर्वमोसमी पावसाने लाखोंचे नुकसान

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : निफाडच्या पूर्व भागात पूर्वमोसमी पावसाने लाखोंचे नुकसान

Share

शिरवाडे वाकद : निफाडच्या पूर्व भागात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान या पावसाने प्रचंड उकाड्यातून व पिकांना दिलासा मिळाला असला तरी मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील झाले.

वाकद, शिरवाडे, कानळदला वादळी वाऱ्यासह दहा मिनिटे गारा व सुमारे एक तास जोरदार पाऊस पडला. वाऱ्याचा जोर इतका भयानक होता की अनेक झाडे उन्मळून पडली, चाऱ्याच्या वळया उडून गेल्या, गारांमुळे द्राक्षे बागांना इजा पोहोचली आहे, संदीप माधव आवारे यांच्या शेतात विजेचे खांब पडले, माजी सरपंच बाळासाहेब सोमनाथ आवारे यांच्या चाळीचे पत्रे उडाल्याने कां

द्याचे नुकसान झाले. गावातील नूतन दशक्रिया शेड बांधण्यात आले होते परंतु या पावसात त्याचेही नुकसान झाले आहे.

तसेच गावातील साहेबराव नामदेव आवारे तसेच सदाशिव धनराव या दोहोंच्या घराजवळील गाईंचे शेड कोलमडून पडले. बडवर वस्तीवरील मारुती मंदिराचे पत्रे उडाले.

कानळदला आज सायं. पाच वाजेच्या सुमारास आलेल्या वादळात शंकरराव कारभारी जाधव यांच्या घराची भिंत कोसळून पत्रेही उडाले. तसेच चाळीचेही नुकसान झाले. या परिसरातील घर व कांदा चाळ तसेच चिताळकर व काळे वस्ती येथील डीपीच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!