Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निफाड : चक्क स्मशानभूमीत वाढदिवस; तरुणांची अंधश्रद्धेविरोधात चळवळ

Share

निफाड : स्मशानभूमी म्हटलं की,प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो. रात्री अपरात्री तिथे जाऊयात म्हटलं की सुशिक्षित वर्गाच्या ही काळजात धस्स होत मात्र चांदोरी येथील तरुणांनी मित्राचा वाढदिवस साजरा करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

स्मशानभूमी ही अंत्यविधी व्यतिरिक्त इतर गोष्टीसाठी वापरण्याचे ठिकाणी असल्याचे अनेक गैरसमज आहेत. मात्र ह्याच अंधश्रद्धेला वाढदिवस साजरा करत हद्दपार कर्णयचे धाडस चांदोरी येथील तरुणांनी केले आहे. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास तरुणांनी चांदोरी येथील स्मशानभूमीत वाढदिवस साजरा करण्यास सुरु केले. एरवी सन्नाटा असलेल्या या स्मशानात तरुणांनी आपल्या मित्राला शुभेच्छा देत शांत असणाऱ्या स्मशानाला नवचैत्यन्य दिले.

यावेळी बड्डे बॉय सोमनाथ कोटमे याने सांगितले कि आपल्या समाजामध्ये अनेक गैरसमजांना खतपाणी घालण्याचे काम केले जाते. यामध्ये सुशिक्षित वर्गच अधिक दिसून येतो. या अंधश्रद्धा दूर होण्याच्या दृष्टीने समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल त्यासाठी स्मशानात वाढदिवसाची कल्पना मला आवडली. त्यामुळे हा वाढदिवस एक सेलिब्रेशन नव्हे तर अंधश्रद्धेविरोधात चळवळ असून ती आम्ही पुःडे चालवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ठरल्याचं शेवटी या तरुणांनी बोलून दाखवलं.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!