Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिड वर्षात नऊ हजार जणांना श्‍वान दंश

Share

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक शहर तसेच जिल्हाभरात कुत्रे चावण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. मागील वर्षी ६ हजार ६०५ तर चालू वर्षी सहा महिन्यात ३ हजार २६८ असे दिड वर्षाच्या कालावधीत ८ हजार ८७३ जणांना कुत्र्याने चावे घेतल्याने त्यांनी शासकीय रूग्णालयांमध्ये उपचार घेतल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

शहरासह जिल्हाभरात भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून कुत्र्यांनी चावा घेण्याचे प्रमाणही वाढत आहे. शहातील जुने नाशिक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने १० जणांवर हल्ला केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याच प्रकारे कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना शहरत तसेच ग्रामिण भागात घडल्या आहेत. मागील पंधरवड्यात बालिकेला घेऊन चार ते पाच भटक्या  कुत्र्यांनी तीचे लचके तोडल्याचा प्रकार अंबड परिसरात घडला होता.

प्रामुख्याने शहरी भागात घरोघरी कुत्रा पाळण्याचे फॅड वाढत आहे. परंतु यासाठी घ्यायच्या लसी, त्यांची नीगा  तसेच खाद्याची योग्य काळजी घेतली जात नाही. अनेकदा पाळीव कुत्र्यांकडून झालेल्या चाव्याकडे दुर्लक्ष होते. तसेच ग्रामिण भागात उपचार दुरवर असल्याने घरगुती उपचार करून रूग्णालयात जाणे टाळले जाते. परंतु असे करणे धोकादायक असून यामुळे भयाणक अशा रेबीज रोगाची लागण होण्याची शक्यता अधिक वाढत असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगीतले.

जिल्हा शासकीय रूग्णालयासह  जिल्ह्यातील सर्व शासकीय रूग्णालयांमध्ये श्‍वान दंशावर रॅबीपुर तसेच इक्वेरॅब या लसीं टोचल्या जातात. चावा घेतलेली जखम अधिक मोठी असल्यास ईमीनोग्लोबीन इंजेक्शन दिले जाते.  परंतु याकडे दुर्लक्ष केल्यास रेबीज होण्याची अधिक शक्यता असते. यामुळे नागरीकांनी श्‍वान दशांकडे दुर्लक्ष न करण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे.

रेबीजचे वर्षभरात ३५ रूग्ण
श्‍वान दंशाकडे वेळीच लक्ष न देणे जीवावर बेतु शकते.    चाव्याकडे दुर्लक्ष करून उपचार न घेतल्याने काही वर्षांी रेबीज उद्भवून मृत्यू झाल्याच्या घटना जिल्ह्या घडल्या आहेत. अशाच प्रकारे रेबीज झालेले सरासरी वर्षभरात ३५ ते ४० रूग्ण शासकीय रूग्णालयात दाखल होतात. त्यांच्यावर वेळीच विशेष कक्षात उपचार करण्यात येतात. अन्यथा अशा व्यक्तींचा मृत्यू निश्‍चित असतो असे वैद्यकीय सुत्रांनी सांगीतले.
लसींचा पुरेसा साठा 
श्‍वान दंशाकडे तसेच त्याच्या उपचारांकडे दुर्लक्ष करणे जीवावर बेतु शकते. कुत्रे पाळणारांनीही याबाबत अधिक सावधगिरी बाळगावी, त्यांचे वेळीच लसीकरण करून घ्यावे, कुत्र्याच्या नखांचे ओरखडे पडल्यानंतरही लस टोचून घ्यावी. कुत्रा चावल्यानंतर योग्य ते प्राथमिक उपचार करून शासकीय रूग्णालयातून लसी टोचून घ्याव्यात. जिल्हा शासकीय रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालये, ग्रामिण रूग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही लसींचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
डॉ. निखील सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक   

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!