Friday, April 26, 2024
Homeनाशिकलोकसहभागातून अक्राळेत उभ राहतयं शिक्षणाचं मंदिर

लोकसहभागातून अक्राळेत उभ राहतयं शिक्षणाचं मंदिर

अक्राळे येथे जि.प.शाळा नवीन ईमारतीचे भूमीपूजन

दिंडोरी | प्रतिनिधी 

“गाव करील ते राव काय करील” या म्हणीचा अर्थ अक्राळेच्या गावकर्‍यांनी प्रत्यक्षात उतवरला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळा लोकसहभागातून बांधण्याचा निर्णय घेतला, आणि प्रत्यक्षात कामाला सुरवात झाली. त्यासाठी गावातील लोकांनी निधी संकलन चालू केले आणि बघता बघता ३ लाख १० हजाराचा निधी जमा झाला. आज (दिनांक ८ जानेवारी ) रोजी सह्याद्री फार्म्स चे चेअरमन विलास शिंदे आणि राम बंधूचे हेमंत राठी यांच्या हस्ते नवीन शाळा ईमारतीचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी ग्रामस्थ,विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.

- Advertisement -

दिंडोरी तालुक्यातील अक्राळे हे अवघ्या १६९०  लोकसख्येच गाव आणि गावात जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची ७ वी पर्यन्त शाळा आहे. शाळेतील विद्यार्थी पटसंख्या १६७ असून विद्यार्थी गुणवत्ता अतिशय चांगली आहे. नवोदय आणि स्कॉलरशिप साठी भरपूर विद्यार्थी येथून पात्र झालेले आहेत.

अडचण होती ती शाळेची ईमारत. मोहाडी क्ल्स्टर अंतर्गत चालू असलेल्या ग्रामविकासाच्या कामात गावकर्‍यांनी शाळेच्या नवीन इमारतीचा विषय मांडला आणि मग गावकरी कामाला लागले. मोहाडी क्लस्टर अंतर्गत दिंडोरी तालुक्यातील १६ गावांचा विकास आराखडा बनवून त्यावर मागील एक वर्षापासून काम चालू आहे. पहिल्या टप्प्यात रस्तेबांधणी, मग सशक्त ग्राम अभियान नंतर “प्रोजेक्ट शिक्षा” अंतर्गत शाळांची सुधारणा हा विषय हाती घेतला. याची सुरवात अक्राळे गावापासुन करण्यात आली.

मागील ३ महिन्यापासून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामविकास समिती सदस्य घरोघरी जाऊन लोकांना याची माहिती दिली आणि लोकवर्गणी जमा करण्यास सुरवात केली. अगदी ५०० रुपयांपासून ११००० पर्यन्त ग्रामस्थांनी देणगी देण्यास सुरवात केलेली आहे.  सोबत शाळेसाठी जागा, त्याचा आराखडा बनवणे यावर देखील काम सुरू झाले.

आराखडा बनविण्याची जबाबदारी  सह्याद्री फार्म्स चे विवेक नेमाडे यांनी घेऊन ती पूर्णत्वास नेली. एकूण नवीन ८ खोल्या आणि ३ जुन्या अशी ११ खोल्यांची प्रशस्त शाळा बांधणीसाठी ४० लाखापर्यन्त खर्च येणार आहे. गावातील नोकरदार मंडळीदेखील निधी उभारणीसाठी पुढाकार घेत आहेत. आज इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी सह्याद्री फार्म्सचे विवेक नेमाडे , मोहाडी क्लस्टर समन्वयक सुरेश नखाते,प्रितिश कारे सरपंच, मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

आज इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी प्राचार्य विलास देशमुख , मोहाडी क्लस्टर समन्वयक सुरेश नखाते , प्रितिश कारे ,सरपंच, मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थ आदि उपस्थित होते.

ग्रामविकासाचा “मोहाडी क्लस्टर”पॅटर्न 

सह्याद्री फार्म्सच्या पुढाकाराने १६ गावांमध्ये मोहाडी क्लस्टर अंतर्गत चालणार्‍या कामात लोकसहभाग महत्वपूर्ण मनाला जातो. त्यातून गावातून निधी उभारणी झाल्यानंतर तेवढीच रक्कम सह्याद्री फार्म्स सीएआर निधीतून देते, उरलेली रक्कम मग शासकीय योजना आणि ग्रामपंचायत यातून उभी करून ते काम पूर्ण केले जाते.लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढल्यामुळे कामाची गुणवत्ता वाढून खर्च कमी होते आणि वेळेची पण बचत होते.

जूनपर्यंत करणार नवीन शाळेची उभारणी 

पुढील शैक्षणिक वर्षात गावातील विद्यार्थ्यांना नवीन इमारतीत बसवण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी गावातील लोक एकजुटीने काम करत आहे. कोणी निधी संकलन तर कोणी इमारत  बांधणी साहित्य संकलन अशी कामे वाटून आपले योगदान देत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या