जि. प. पोटनिवडणूक : खेडगाव गटात ८ तर मानुरमध्ये ६ उमेद्वारी अर्ज दाखल
Share

दिंडोरी । प्रतिनिधी
दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या खेडगाव गटात 8 उमेद्वारांनी अर्ज दाखल केले असून भाजपचा अर्ज निर्धारीत वेळेत न आल्याने भाजपला अर्ज दाखल करता आलेला नाही. राज्याच्या राजकारणाचा प्रभाव दिंडोरी तालुक्यातही पडला असून वेळप्रसंगी काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महाशिवआघाडीकडून धनराज महाले हे एकमेव उमेद्वार होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.
दिंडोरी तहसिलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रांत संदिप आहेर यांनी उमेद्वारांकडून अर्ज स्विकारले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केला.
अपक्षही अर्ज त्यांनीच दाखल केला. शिवसेनेच्या वतीने धनराज महाले यांनी अर्ज दाखल केला. पंचायत समिती सभापती एकनाथ खराटे यांनीही अर्ज दाखल केला. विजय वाघ यांनी अर्ज दाखल केला.
साहेबराव खराटे यांनी माकपच्या वतीने अर्ज दाखल केला. योगेश वाघ यांनी राष्ट्रवादीच्या वतीने अर्ज दाखल केला तर परशराम गांगोडे यांनी माकपच्या वतीने अर्ज दाखल केला आहे.
एकुण 8 उमेद्वारी अर्ज दाखल झाले आहे. असे असले तरी ज्यांनी अर्जासोबत पक्षाचे अधिकृत तिकीट जोडले आहे तेच अर्ज छानणीत वैध ठरवले जातील.
आज अर्ज छानणी असून त्यानंतर लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. भाजपचा उमेद्वारी अर्ज निर्धारीत वेळेत दाखल होऊ शकला नाही. एक मिनिटाच्या अंतरावरुन वेळ संपल्याने भाजपला अर्ज दाखल करता आला नाही. त्यामुळे आता जर लढत झाली तर महाशिवआघाडी विरुध्द माकप अशी लढत होईल अथवा धनराज महाले यांना बिनविरोधही निवडून दिले जावू शकते असा अंदाज बांधला जात आहे.
खेडगाव, मानूर आणि गोवर्धन गटात पोटनिवडणूक होत असून या निवडणूकां महाशिवआघाडीच्या वतीने एक उमेद्वार देवून लढवल्या जाणार आहे. जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या निवडणूकांमध्ये लक्ष घातले आहे.
खेडगाव गटात शिवसेनेकडे होता. मानुर व गोवर्धन गट राष्ट्रवादीकडे होता. त्यानुसारच महाशिवआघाडीने जागा वाटप केले असून मानुर व गोवर्धन गटात राष्ट्रवादीचा उमेद्वार राहिल तर खेडगाव गटात शिवसेनेचा उमेद्वार उभा राहिल अशी साधारण चर्चा आहे.
कळवण तालुक्यातील मानुर गटात राष्ट्रवादीकडून वैष्णवी सांबळे, भाजपकडून गिंताजली पवार-गोळे, काँग्रेसकडून रंजना पवार, माकपकडून हेमलता पवार यांचा अर्ज दाखल झाला आहे.
ए. टी. पवार घराण्यातून गिंताजली पवार या आमदार नितीन पवार, खा.डॉ.भारती पवार यांच्यानंतर राजकारणात उतरल्या आहे. गिंताजली पवार ह्या ए.टी.पवारांच्या कन्या आहेत. गिंताजली पवार व वैष्णवी साबळे यांनी अपक्षही अर्ज दाखल केले आहेत.