Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

Video : सैन्यभरती नाही झालात तरी चालेल, एक चांगला माणूस व्हा; वीरपत्नी विजेताची आर्त हाक

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी

तुम्ही जर देशात काही बदल घडवू इच्छित असाल तर आपल्या घरातून सैन्यात भरती व्हा, जर तसे होत नसेल तर ज्या ठिकाणी आहात, त्या ठिकाणी चांगले काम करा…छोट्या-छोट्या कामातून आपल्या देशाच्या विकासाला हातभार लावा, त्यासाठी सैन्यात भारतीय व्हायला पाहिजे असं काही नाही… अशा शब्दांत वीरपत्नी विजेता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी शहीद वीरपत्नी यांनी जनतेला उद्देशून आपल्या भावना व्यक्त केल्या.

त्या म्हणाल्या, माझे पती शहीद निनाद नुसते जवान नव्हते तर एक चांगले व्यक्ती होते. ते खूप धाडसी होते. त्यांच्यात खूप निर्णयक्षमता होती. कधीही त्यांचे निर्णय चुकले नाहीत. निनाद आज देशासाठी शहीद झाले याचा सार्थ अभिमान आहेच. कुठल्याही देशाविरोधात घोषणाबाजी करू नका, आपल्या देशाच्या प्रगतीकडे बघून देशालाही हेवा वाटला पाहिजे असे काम देशात राहून करा.

यासाठी प्रत्येकाने सैन्यात भरती होण्याची गरज नाही. आपण ज्या ठिकाणी काम करतो ते योग्यप्रकारे करा. देशाच्या प्रगतीत हातभार लावा. देश स्वच्छ ठेवा, एकमेकांचा आदर करा, सामाजिक एकता जपा, देशातील महिलांची सुरक्षितता जपायातून भारत भव्य राष्ट्रनिर्माण होण्यास मदत होईल.

पुढे त्या म्हणाल्या, आपल्या देशातील नागरिकांनी छोट्या छोट्या गोष्टी अशा करा ज्याद्वारे आपल्या सैनिकही अभिमान बाळगतील. सैन्यातील प्रत्येक जवान आनंदी राहू शकतील, जेव्हा त्यांना कळेल की आपला देश, घर सुरक्षित आहे, सैनिकांना आपले घर जर सुरक्षित असेल तर ते सुरक्षित असल्याचे जाणवते.

तसेच आपला देशातील जवानांचा अभिमान बाळगा, त्यावेळी कुठल्या देशाची आपल्यावर हल्ला करण्याची हिम्मत झाली नाही पाहिजे अशा कणखर शब्दांत त्यांनी देशातील नागरिकांना आवाहन केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!