Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; दोन एकर क्षेत्रावर फिरवला नांगर

Share

विखरणी | राजेंद्र शेलार

येवला तालुक्यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. महागडी औषधे फवारूनदेखील लष्करी अळी कमी होत नसल्याने शेतकऱ्यांना उभे पिक सोडून देण्याची वेळी आहे.

येथील शेतकरी बाबाजी शंकर चाफेकर यांच्या अडीच एकरात मका पिकाची लागवड केली आहे. पिक उगवले मात्र लष्करी अळीचा त्यावर प्रादुर्भाव झाला.  महागडे बियाणे आणून हजारो रुपये खर्च केले. त्यानंतर रासायनिक औषधे फवारणी करावी लागली या फवारणी नंतर काही दिवस लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी झाला. मात्र पुन्हा एकदा लष्करी अळी पिकात दिसू लागल्याने परत एकदा औषधे मारण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसल्याने उसनवारी करून औषध फवारली तरी त्याचा उपयोग होईलच याची खात्री नसल्याने पिकात नांगर घालण्याची दुर्दैवी वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.

गतवर्षी पडलेल्या दुष्काळामुळे हातात पैसा नसतानाही उधार उसनवारी करून बी-बियाणे रासायनिक खते औषधे विकत आणावी लागल्याने उत्पन्न सोडाच भांडवलाचा खर्चावरही पाणी सोडण्याची दुर्दैवी वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे.

यावर्षी मकासारखे पिक घेऊन अधिक उत्पन्न मिळेल या स्वप्नांचा चुराडा झाला आहे. या शेतकऱ्याकडे ५ ते ६ जनावरे असून जनावरांच्या चाऱ्याची तजवीज व्हावी यासाठी या शेतकऱ्यांने दोन एकर क्षेत्रात बाजरीची पेरणी केली आहे. आता बाजरीचे पीक तरी चांगल याव अशी अपेक्षा या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

दोन एकर मका लागवडीसाठी ५२०० रुपयांचे बियाणे औषधे फवारणीसाठी हजारो रुपयांचा खर्च करूनही लष्करी अळीचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने अखेर मका नांगरून टाकावी लागली. मका पिकाचा विमा उतरवला आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावामुळे माझ्या पिकाचे नुकसान झाल्याने भरपाई मिळावी.

बाबाजी शंकर चाफेकर, उंदिरवाडी तालुका येवला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!