Thursday, April 25, 2024
HomeनाशिकVideo : मुंबईच्या यश शर्माला चौदा सुवर्ण; एमडी मेडिसिन होऊन करणार रुग्णसेवा

Video : मुंबईच्या यश शर्माला चौदा सुवर्ण; एमडी मेडिसिन होऊन करणार रुग्णसेवा

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा आज १९ वा दीक्षांत समारंभ मोठ्या थाटात पार पडला. यावेळी लक्ष वेधले ते मुंबईच्या यश शर्मा याने. एमबीबीएसच्या प्रथम वर्षापासून पदवी पूर्ण होईपर्यंत त्याने एकूण १४ सुवर्णपदकांना गवसणी घातली. यासोबतच जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीकडून वैद्यकीय स्नातकांना देण्यात येणार मानाचा रोख पुरस्कारदेखील मिळवला.

- Advertisement -

यशने एकूण 14 सुवर्णपदके पटकावली आहेत. यामध्ये पहिल्या दोन वर्षांची चार तर तिसर्‍या वर्षाची एकूण 10 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. तसेच 10 हजाराचे बक्षिसदेखील त्याला मिळाले आहे.

मुळचा मुंबईचा असलेला यश शर्मा हा मुंबईतील प्रसिद्ध सेठ जीएस मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याचे आई वडील दोघेही स्त्रीरोग तज्ञ आहेत. दोघांनीही केईएम हॉस्पीटल महाविद्यालयातून एमबीबीएस पुर्ण केले तर मुंबईच्या जे. जे. हॉस्पीटलमधून एमडी पुर्ण केल्याचे यशने सांगितले.

यश ला पुढे एम डी मेडिसिन व्हायचे आहे तसेच जेजेमधूनच एमडी पुर्ण करणार असल्याचे यशने सांगितले. शिक्षण पूर्ण करून अतिदुर्गम भागात रुग्णसेवा पोहोचविण्यासाठी यश हातभार लावणार आहे. सर्वसामान्यांची सेवा करण्याचे ध्येय असल्याचे यशने देशदूतशी बोलताना सांगितले.

तिसऱ्या वर्षी यशने मिळवलेले सुवर्णपदक

1. डॉ दयानंद देवगावकर गोल्ड मेडल

2. व्यंकटेश जामकर गोल्ड मेडल

3. राजेबहाद्दूर फाउंडेशन गोल्ड मेडल

4. डॉ एस एम पाटणकर गोल्ड मेडल

5. डॉ कुणाल एल महादूले गोल्ड मेडल

6. श्री श्रीराम खुशाबा बाकरे मेमोरियल गोल्ड मेडल

7. डॉ अंजानेयुलू गोल्ड मेडल

8. डॉ सुभाष काश्यपे प्रेसिडेंट श्री मेडिकल रिसर्च सेंटर नाशिक गोल्ड मेडल

9.डॉ डीबी शिरोळे गोल्ड मेडल पेडियट्रिक्स

10. शामराव मांगो तथा नानासाहेब चौधरी गोल्ड मेडल

11. जॉन्सन अँड जॉन्सनकडून 10 हजारांचे रोख बक्षीस

- Advertisment -

ताज्या बातम्या