शाओमीने आणले अनोखे मास्क

0

देशदूत डिजिटल वृत्त

नाशिक शाओमीने भारतीय युजर्ससाठी एमआय एयरपॉप पीएम २.५ हा प्रदूषण रोधक मास्क सादर करणार असल्याची घोषणा केली आहे.

याचा टिझरदेखील जारी करण्यात आला होता. या अनुषंगाने एमआय एयरपॉप पीएम २.५ हा मास्क भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे.

देशात सध्या वायूप्रदूषणाची समस्या गंभीर आहे. अनेक शहरे वेगवेगळ्या प्रदूषणाने त्रस्त आहेत. शाओमीने तर भारतात सर्वात किफायतशीर मूल्यात विविध एयर प्युरिफायर्स लाँच केले आहेत.

यानंतर प्रदूषणाचा वैयक्तिक पातळीवरून प्रतिकार करण्यासाठी एमआय एयरपॉप पीएम २.५ हा प्रदूषण रोधक मास्कचे सादरीकरण करण्यात आला आहे. या मास्कची किंमत २४९ रूपये असून याला कंपनीच्या एमआय डॉट कॉम या संकेतस्थळावरून खरेदी करता येणार आहे.

एमआय एयरपॉप पीएम २.५ या प्रदूषण रोधक मास्कच्या मदतीने वायू प्रदूषणापासून अटकाव करता येणार आहे.

या मास्कसाठी अतिशय दर्जेदार फॅब्रिक वापरण्यात आले असून ते युजरला फायदेशीर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

LEAVE A REPLY

*