Friday, April 26, 2024
Homeनाशिकतुम्हीही ‘वर्क फ्रॉम होम’ करताय? मग या सायबर सिक्युरिटी टिप्स तुमच्यासाठी

तुम्हीही ‘वर्क फ्रॉम होम’ करताय? मग या सायबर सिक्युरिटी टिप्स तुमच्यासाठी

मुंबई : सध्या जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असतानाच शासनातर्फे तसेच सर्व जनतेकडून सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. सगळीकडे लॉकडाऊन, जनता कर्फ्यू लावून या महामारीपासून बचाव करण्याचे प्रयत्न होत आहेत.

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी सुद्धा वर्क फ्रोम होम पद्धतीचा अवलंब करत आपल्या कंपनीच्या अधिकारी कर्मचारी यांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

साधारण गेल्या आठवड्यापासून वर्क फ्रोम होम सुरु झालेले असतानाच आपण सगळे घरातून इंटरनेट द्वारे आपल्या कंपनीच्या सहकारी, व्हेंडर तसेच टीम वर्क मध्ये आपल्या सहकाऱ्यांसह काम करत आहोत.

परंतु यापलीकडे विचार करण्याची गोष्ट म्हणजे वर्क फ्रोम होम करत असताना आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे. हि बाब लक्षात घेणे तितकेच आवश्यक आहे.
कारण जिथे इंटरनेट आहे, तिथे कोणीच सेफ नाही.

जास्तच खोल विचार करायचा झालाच तर आतंकवादी कारवाया, सायबर टारगेटेड हल्ले अश्या अनेकप्रकारे कंपन्यांना, आपल्याला किंवा आपल्या गोपनियतेला धोका असेल अश्या घातक गोष्टी सायबर मार्गे होण्याची शक्यता या काळात जास्त आहे.

परिणामी, या काळात आपल्या कंपनीसाठी काम करत असताना आपल्याकडून काही महत्वाच्या सूचनांचे पालन व्हायलाच हवे.

या टिप्स फॉलो करा…

तुम्ही वापरत असलेली इंटरनेट सेवा हि सुरक्षित असायला हवी.

जर तुम्ही वायफाय वापरत असाल तर ते किती सुरक्षित आहे, ते तपासा.

पब्लिक वायफायचा वापर करण्यापेक्षा स्वतःचे वायफाय कनेक्शन वापरा.

हे शक्य नसल्यास स्वतःच्या मोबाईलचे hotspot कनेक्शनद्वारे इंटरनेटचा वापर करा.

आपण काम करत असलेले मोबाईल, लॅपटॉप घरामध्ये असताना व्यवस्थित ठिकाणीच ठेवा.

आपल्या सोबत हे डिव्हाईस नसताना ते व्यवस्थित लॉक केले असल्याची खात्री करा.

कंपनीने आपल्याला दिलेला डोमेन युजरनेम, पासवर्ड यांसारखे महत्वाचे खाजगी कोड कोणासोबत शेयर करू नका, घरात देखील लॅपटॉपवर सेव्ह करू नका किंवा घरात कोठेही लिहून ठेवू नका.

सोशल मिडीयाच्या साईट्सवर वर्क फ्रोम होम चे फोटो शेयर करताना फोटोद्वारे आपल्या कंपनीची गोपनीय माहिती शेयर होणार नाही याची काळजी घ्या.

मालवेयर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही काम करत असलेल्या लॅपटॉप, मोबाईल मध्ये अद्ययावत केलेले अँटीव्हायरस असणेही तितकेच आवश्यक आहे.

अज्ञात संकेतस्थळावरून अथवा अज्ञात इमेल वरून आलेली माहिती किंवा फोटो, फाईल्स डाऊनलोड करू नका. (जरी ते कोरोना संबंधित असले तरीदेखील).

या प्रमुख बाबींची काळजी घेतल्यास आपण आणि आपण काम करत असलेली कंपनी identity theft, phishing attacks, data loss, privacy loss, malware attacks etc. यांपासून वाचू शकते.

सध्याच्या काळात स्वतःच्या आरोग्यासोबतच या गोष्टींची काळजी घेणेही क्रमप्राप्त ठरेल.

लेखक : साईनाथ पी. नागरे

सायबर सिक्युरिटी मॅनेजर, रिलायन्स इंडस्ट्रीज

- Advertisment -

ताज्या बातम्या