Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

बेकायदेशीर लाकूड कापणाऱ्या ‘सॉ-मिल’वर छापा; संशयित फरार, साहित्य सील

Share

file photo

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमधील मातोरी शिवारात बेकायदेशीरपणे ‘सॉ-मिल’ चालवून लाकडांची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. यानुसार आज सकाळी छापा टाकून आरागिरणी उद्ध्वस्त करण्यात आली. नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रादेशिक पथकाने ही कारवाई केली.

अधिक माहिती अशी की, या कारवाईत मातोरी शिवारातील संशयित पांडुरंग मुरलीधर चारोस्कर याने त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना लाकूड कापण्याची आरागिरणी सुरू केली होती. या आरागिरणीमध्ये मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या, बुंध्यांची कापणी केली जात असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती.

संशयित घात्नासाठली चारोस्कर याने १६ इंची करवत (ब्लेड) लावलेले आरायंत्रदेखील उभारले होते. या उभ्या आरायंत्रामार्फत सर्रासपणे लाकडांची कापणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जास्त असल्याचे लक्षात आले.

यावेळी संशयित चारोेस्कर हा घरी आढळून आला नाही. पथकाने आरायंत्र, १ इलेक्ट्रिक मोटारसह संपुर्ण सांगाडा असा एकूण ५० ते ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वनक्षेत्रपाल विवेक भदाणे करत आहेत. .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!