Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : नाशिकमध्ये महिला दांडियाची वाढतेय क्रेझ

Share

नाशिक | बागेश्री पारनेरकर

नवरात्रोत्सव असल्याने नऊ दिवस सगळीकडे देवीचा जागर तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सुरू आहे. कार्यक्रमांबरोबरच  गरबा, दांडियामुळे तरूणाईमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. संपूर्ण नऊ दिवस तरूणाई गरबा, दांडियाच्या तालावर थिरकताना दिसत आहे. तरूणाईबरोबरच महिलांमध्येही गरबा, दांडियाची क्रेझ वाढताना दिसत आहे.

नाशिकमधील विविध परिसरात अनेक संस्था मोठ्या प्रमाणावर गरबा दांडियाचे आयोजन करतात. या सगळ्यात ‘महिला दांडिया’ हा प्रकारही रूढ होताना दिसत आहे.

नाशिकच्या राणेनगर परिसरातील सतीश सोनवणे यांच्या युनिक ग्रुपतर्फे गेल्या पाच वर्षांपासून ‘महिला दांडिया’ चे आयोजन करण्यात येते. नऊ दिवस फक्त महिलांसाठी याचे आयोजन करण्यात येते.

दरवर्षी याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. यावर्षी नऊ दिवस वेगवेगळ्या भजनी मंडळाच्या महिलांना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते देवीची आरती आरती करून भजनाचा कार्यक्रम सादर केला जातो. त्यानंतर गरबा दांडियाचे आयोजन केले जाते.

अनेकदा महिलांना एकत्रित ठिकाणी गरबा खेळताना अवघडल्यासारखे वाटते. म्हणून महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी, गरबा खेळताना त्यांना सुरक्षितता वाटावी या हेतूने ही कल्पना राबविली जाते, असे युनिक महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता सोनवणे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!