Tuesday, April 23, 2024
Homeनाशिकनाशिक : वेबसाईटवर फेक फ्रोफाईल तयार करत महिलांची फसवणूक करणारा ‘नवरदेव’ ताब्यात

नाशिक : वेबसाईटवर फेक फ्रोफाईल तयार करत महिलांची फसवणूक करणारा ‘नवरदेव’ ताब्यात

नवीन नाशिक | प्रतिनिधी 

विवाह नोंदणी संकेतस्थळ असलेल्या शादी डॉट कॉम व जीवन साथी डॉट कॉमवर फेक प्रोफाइल तयार करून एका संशयिताने राज्यातील विविध जिल्यातील ५० पेक्षा अधिक घटस्पोटीत महिलांची फसवणूक करण्याचा संतापजनक प्रकार आज उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरु आहे.

- Advertisement -

अधिक माहिती अशी की, संपत दरवडे उर्फ मनोज पाटील उर्फ मयूर पाटील हा इसम शादी डॉट कॉम व जीवन साथी डॉट कॉम सारख्या विवाह नोंदणी संकेतस्थळावर आपले खोटे प्रोफाइल तयार करून  ज्या महिला घटस्फोटित व मूल बाळ असलेल्या महिलांना  तो लग्नासाठी मागणी घालत असे.

यानंतर महिलेच्या परिवारातील सदस्यांचा विश्वास संपादित करत व थोड्याच दिवस लग्न करू असे आश्वासन देऊन सलोखा वाढल्यानंतर पैसे व सोन्याच्या दागिन्यांची मागणी हा व्यक्ती करत असेल.

वैवाहिक जीवनात चांगली व्यक्ती मिळावी यासाठी मुलगी व तिच्या आईवडिलांच्या भावना संपादन करून तो पैसे आणि दागदागिने घेऊन पोबारा करत असे.

हा प्रकार वाढल्यानंतर या महिला एकत्रित आल्या. त्यांनी नाशिकमध्ये हा व्यक्ती येणार असून एका महिलेला असेच फसवणार असलायचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांच्या कानावर बाब घातली. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ सीताराम कोल्हे यांच्याशी संपर्क साधला.

कोल्हे यांनी या व्यक्तीला पकडण्याकरिता यशस्वी सापळा उभारण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यानुसार काल (दि.०५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील पंचवटी परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेतले.

यावेळी गुन्हे शाखेच्या संदीप पवार, संजय गमाणे, दिलीप ढुमने, गंगाधर केदार यांच्यासह छत्रपती सेनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या