Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

सावधान! इंटरनेट वापरताना अनावश्यक लिंक ओपन होतात? तुमचीही होऊ शकते फसवणूक

Share

देशदूत डिजिटल विशेष

नाशिक | प्रतिनिधी

एखादे संकेतस्थळ बघताना अनेक लिंक अपोआप ओपन होतात. कुठे क्लिक करावे ते कळत नाही. यादरम्यान, कळत नकळत कुठल्यातरी लिंकवर युजर क्लिक करतो. यात एखादी व्हायरस असलेली फाईल डाऊनलोड होते. यातून वैयक्तिक माहिती चोरी होण्याची दाट शक्यता निर्माण होते. यातून अनेक आर्थिक तोटे नेटकरयांना सोसावे लागले आहेत.

सगळीकडे मतदानाचा माहोल आहे. कुठेही जा तिथे फक्त आणि फक्त मतदान, आगामी पंतप्रधान कोण होणार? यावर तर्क वितर्क लढविले जात आहेत. सर्वात प्रभावी संपर्काचे माध्यम म्हणून संबोधला जाणारा सोशल मीडिया सध्यातरी व्यस्त आहे.

अमुक नेत्याचा फोटो शोधणे, बालपणीचे फोटो, त्यांचा इतिहास शोधणे याबाबतची माहिती अनेक युजर्स सध्या नेटवर शोधत आहेत. यावेळी अशा अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे व्हायरस मोबाईल किंवा संगणकामध्ये शिरतो याचे विपरीत परिणाम युजर्सला भोगावे लागतात.

यामुळे कुठलीही लिंक ओपन केल्यानंतर आपण योग्य लिंक शेअर करतो आहोत का? याची काळजी घ्यावी. यामुळे संभाव्य धोका टळू शकतो असे तज्ञ सांगतात.

असा होतो फिशिंग अटॅक

आपल्याला येणारा मेसेज एखाद्या माणसाच्या नावाने अथवा कुठल्याही देशाच्या नावाने न येता असा एक वेगळाच येतो. त्याच्यामध्ये आपल्याला ठराविक माहिती सांगून त्याच्या खाली एखादी फाईल किंवा लिंक दिलेली असते की, ज्याला आपल्याला क्लिक करायला सांगितले जाते.

आपण जेव्हा त्या फाईल किंवा लिंकला क्लिक करतो, तेव्हा एखाद्या वेबसाइटवरून किंवा स्टोरेज बॉक्समधून आपल्याकडे मोबाईलवरत एक फाईल डाऊनलोड होते. ती फाईल स्पेशियस मालवेअर किंवा इन्फेक्ट होणाऱ्या व्हायरससारखी असते.

बऱ्याच वेळेला अशी फाईल जेव्हा डाउनलोड होते, तेव्हा आपला कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर याचा परिणाम होतो. आपल्याकडून आपले यूजर नेम, पासवर्ड, क्रेडिट कार्डची इन्फर्मेशन तसेच आपली इतर खासगी इन्फर्मेशन अॅक्सेस करायचा प्रयत्न केला जातो.

आपणास हे पण लक्षात येते की, या गोष्टी या कॅम्पेनिंग थ्रू केल्या जातात. बऱ्याचदा आपणास असेही लक्षात येते की हे कॅम्पेनिंग लग्न किंवा कुठला इव्हेंट तसेच वर्धापन दिन अथवा इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी लोकांना एकत्र करण्यासाठी, एखादा प्रोग्राम प्रमोट करण्यासाठी वापरली जाणारी एक सोय आहे. या सोयीचा गैरवापर करून, डेटाची चोरी करून, या मार्गाचा असा गैरवापर होऊ शकतो.

अशी घ्या काळजी

१. सोशल मिडिया थ्रू किंवा अॅप्लिकेशनद्वारे आपल्याला एडिट किंवा मॉडिफाय केलेले फोटो खरे आहेत असे भासवून चुकीची माहिती सहजपणे दाखवली जाऊ शकते. त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.

२. आपल्याला आलेल्या ई-मेल किंवा मेसेजमधील कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका अथवा कुठलीही फाईल डाऊनलोड किंवा ॲप्लिकेशन डाउनलोड करून इन्स्टॉल करू नका.

३. वोटिंग पिरेडच्या वेळी आपले आधारकार्ड, पॅनकार्ड हे शासकीय अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणाच्याही हातात देऊ नका.

४. तुम्हाला आलेले ओटीपी किंवा तुम्ही ज्या वेबसाईटवरत जाणार आहात ती वेबसाईट खरी आहे की नाही याची शहनिशा करा.

५. कधीही, कोणत्याही वेळी/प्रसंगी तुमचा ओटीपी कोणासोबत शेअर करू नका. तुमचे जे कोणते ब्राउजर असेल किंवा अप्लिकेशन असेल ते नेहमीच अपडेट करत राहा.

६. आपला युजरनेम आणि पासवर्ड हा कोणालाही सांगू नका. तसेच तो तयार करताना दोन मोठी अक्षरे, दोन छोटी अक्षरे, दोन नंबर, दोन कॅरेक्टर आणि दोन स्पेस याचा उपयोग करून पासवर्ड तयार करा व तो इतरांना सांगू नका.

७. तुम्हाला जर फसवा मेसेज येत असेल किंवा कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती किंवा प्रसार होत असल्याचे लक्षात आल्यास ते त्वरित आयोगास कळवा.

८. आपल्याला ज्या गोष्टीबद्दल माहित नाही अशी गोष्ट सोशल माध्यमातून इतर ठिकाणी पसरवू नका. जर ते खोटे असेल तर सायबर गुन्हा होऊ शकतो.

तन्मय दीक्षित, सायबर सिक्युरिटी तज्ञ नाशिक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!