Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : वावी बस स्थानकाचे छप्पर गुल; प्रवाशी सोसतायेत उन्हाच्या झळा

Share
  • नुतनीकरणासाठी प्रवासी शेडचे पत्रे काढले,10 दिवस उलटून देखील काम बंदच

  • वाहतूक नियंत्रणक मात्र सावलीत

सिन्नर (अजित देसाई) |

शिर्डी महामार्गावरील महत्वाचा थांबा असणाऱ्या वावी येथील बसस्थानकाच्या नूतनीकरणासाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवजयंतीदिनी या कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर गेल्या पंधरवड्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन केले गेले आहे. यासाठी जुन्या प्रवासी शेडचे 10 दिवसांपूर्वीच पत्रे काढून घेण्यात आले आहेत. मात्र प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीच व्यवस्था नसल्याने बसच्या प्रतीक्षेत 40 डिग्रीच्या उन्हात ताटकळण्याची वेळ आली आहे.

या संदर्भात सिन्नर आगर व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांना विचारले असता काम सुरू आहे, असे ते म्हणाले, वास्तवात मात्र पत्रे खोलण्यापलीकडे एक वीट देखील या कामावर टाकण्यात आलेली नाही. ठेकेदाराकडून प्रवासी निवाऱ्याची तात्पुरती सोय करून घेतल्यावरच अस्तित्वातील जुने शेड खोलायला हवे होते. मात्र तसे न करता अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवून गैरसोय केली आहे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

वाहतूक नियंत्रक कक्ष आहे सावलीत

प्रवासी शेडचे पत्रे खोलले मात्र वाहतूक नियंत्रक यांच्यासाठीची केबिन मात्र जैसे थे असून एसटीचा अधिकारी सावलीत आणि प्रवासी मात्र उन्हात असे चित्र वावीच्या बसस्थानकात आहे.

प्रवाशांना घ्यावा लागतो आडोशाचा आधार

आवारात सावलीसाठी आडोसा शोधण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. उन्हात उभे राहिल्याने प्रवाशांच्या जीवावर बेतू शकते. मात्र, याकडे दुर्लक्ष करून एसटी प्रशासन ठेकेदारकडे बोट दाखवून स्वतःचा बचाव करीत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!