Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : धरणसाठयात झपाटयाने वाढ; गंगापुर ३८ तर दारणा ४५ टक्के भरले

Share

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक, त्र्यंबक व इगतपुरी तालुक्यात शनिवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोदावरी खोऱ्यातील धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्र्यंबकला एका दिवसात 200 मिलीमीटर तर नाशिकमध्ये 102 मिलीमीटर इतका पाऊस पडल्याने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणातील साठा 13 वरून 34 टक्क्यांवर पोहोचला असताना गेल्या २४ तासांत यात आणखी चार टक्क्यांची भर पडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

तर दारणा धरणाचाही साधत ३८ टक्क्यांवर सात टक्क्यांनी वाढून ४५ टक्क्यांवर गेला आहे. नाशिक शहरात मुसळधार पाउस थांबला असला तरी इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे.

त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून धरणातील पाणीसाठ्यात वाढ बघायला मिळते आहे.  जून महिना जवळपास कोरडा गेल्याने दुष्काळाने होरपळणार्‍या जिल्ह्यात पाणीबाणीचे संकट निर्माण झाले होते.

जिल्ह्यातील 24 धरणांत अवघा 4 टक्के साठा शिल्लक होता. जिल्हावासियांना पावसाची प्रतीक्षा असतानाच जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावत दिलासा दिला आहे.

असे असले तरी अद्याप जिल्ह्यातील सातपेक्षा अधिक महत्वाची समजली जाणारी धरणे कोरडीठाक असून यामुळे पेरणीला उशीर होण्याची शक्यता आहे.

सात धरणे कोरडीठाक

पाच ते सहा तालुक्यांचा अपवाद वगळता इतर तालुक्यांमध्ये पावसाने अद्याप दडी मारली आहे. त्यामुळे या क्षेत्रात मोडणार्‍या पुणेगाव, तीसगाव, भोजापूर, चणकापूर, केळझर, नागासाक्या व माणिकपुंज या सात धरणांमध्ये शून्य टक्के जलसाठा आहे. या ठिकाणी दमदार पावसाची अपेक्षा आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!