Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : जुन्या नाशकात पुन्हा वाडा कोसळला; चौघांना वाचवले, मदतकार्य सुरु

Share

जुने नाशिक | फारूक पठाण

जुने नाशिक परिसरातील खैरे गल्लीत मोदकेश्वर मंदिराशेजारी असलेला नाकील वाडा कोसळल्याने खळबळ उडाली. या घटनेत चौघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कुठलीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे.

अधिक माहिती अशी की, येथील नाकीलवाडा 4156 घर नंबर यातील काही भाग आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कोसळला. याठिकाणी मंगल शिवाजी काळे वैदिक अरुण काळे व दोन लहान मुले अडकले होते. त्यांना नगरसेवक शाहू खैरे, नगरसेविका वत्सला खैरे, कैलास पिसे, कुणाल व्यवहारे, राजेश जगताप यांच्यासह स्थानिक तरुणांनी मदतकार्य करून चौघांना सुखरूप बाहेर काढले.

हा वाडा राजू वसंत नाकील यांच्या मालकीचा आहे. याठिकाणी तेजस नाकील यांच्यासह काही भाडेकरू राहतात. तसेच नरेंद्र काकडे व काळे परिवार याच ठिकाणी वास्तव्यास होते.

अग्निशमन विभागाचे राजेंद्र बैरागी यांच्यासह २० अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले आहे.  उर्वरित धोकेदायक वाडा पाडण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरु आहे.  जवान नाना गांगुर्डे, शिवाजी फुगट, तौसीफ शेख, पीपी बोरसे, पी, व्ही पाटील या अग्निशमन विभागाच्या जवानांनी मदतकार्य केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!