Type to search

नाशिकमध्ये 15 लाख तर दिंडोरीत 14 लाख स्लीपचे वाटप

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये 15 लाख तर दिंडोरीत 14 लाख स्लीपचे वाटप

Share

नाशिक । प्रतिनिधी

चौथ्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी (दि.29) होणार असून निवडणूक शाखेकडून मतदारांना वोटर स्लिप वाटण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात 15 लाख 36 हजार तर दिंडोरी मतदारसंघात 13 लाख 95 हजार वोटर स्लिपचे वाटप पूर्ण झाले आहेत. पुढील तीन दिवसात उर्वरीत मतदारांना वोटर स्लीप वाटण्याचे आव्हान निवडणूक शाखे समोर आहे.

नाशिक मतदारसंघात मतदारांची संख्या 18 लाख 82 हजार 46 इतकी आहे. तर, दिंडोरी मतदारसंघात 17 लाख 28 हजार 651 मतदार आहेत. या दोन्ही मतदारसंघासाठी येत्या सोमवारी मतदान होणार आहे. मतदारांना त्यांचा मतदानाचा अधिकारी बजावणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी निवडणूक शाखेकडून बीएलओद्वारे वोटर स्लिप वाटण्याचे काम सुरु आहे.

पुर्वी हे काम राजकीय पक्षांचे प्रतिनिधी करायचे. मात्र, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी,यासाठी हे काम निवडणूक शाखेचे कर्मचारी करत आहेत. वोटर स्लिपवर मतदाराचे नाव, मतदान केंद्र, मतदार यादी भाग आदीची माहिती दिली असते. निवडणूक शाखेकडून दोन्ही मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय वोटर स्पिल वाटपाचे काम सुरु आहे.

नाशिक मतदारसंघात 15 लाख 36 हजार 433 वोटर स्पिलचे वाटप झाले आहे. एकूण 81 टक्के स्लिप वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. तर, दिंडोरी मतदारसंघात 13 लाख 95 हजार 725 वोटर स्लिपचे वाटप झाले असून हे प्रमाण 80 टक्के इतके आहे. मतदानाला तीन दिवसांचा अवधी शिल्लक असून रविवारी (दि.28) शासकीय सुट्टीच्या दिवशीही मतदारांना स्लिप वाटण्याचे काम सुरु राहणार आहे.

1950 टोल फ्रि नंबरवर संपर्क साधा

दोन्ही मतदारसंघात वोटर स्लिप वाटण्याचे काम जवळपास 80 टक्के पूर्ण झाल्याचा दावा निवडणूक शाखेकडून केला जात आहे. मात्र, अनेक मतदारांकडून स्लिप न भेटल्याची तक्रार केली जात आहे. स्लिप न मिळाल्यास नेमके कोणत्या ठिकाणी मतदान करायला जायचे हा प्रश्न मतदारांना पडला आहे. ही समस्या लक्षात घेता निवडणूक आयोगाने मतदारांना 1950 हा टोल फ्रि क्रमांक उपलब्ध करुन दिला आहे. मतदारांनी या नंबरवर कॉल केल्यावर त्यांना त्यांचे मतदान केंद्रांची माहिती दिली जाईल. ही सेवा 24 तास सुरु असून मतदारांनी अडचण निर्माण झाल्यास संपर्क या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार (निवडणूक) प्रशांत पाटील यांनी केले आहे.

वोटर स्लिप वाटप आकडेवारी

दिंडोरी मतदारसंघ
नांदगाव 251723
कळवण 217973
चांदवड 216926
येवला 212428
निफाड 212016
दिंडोरी 284655

नाशिक मतदारसंघ
सिन्नर 238601
नाशिक (पूर्व) 286238
नाशिक (मध्य) 261077
नाशिक (पश्चिम) 309771
देवळाली 227289
इगतपुरी 213457

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!