Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या राजकीय

महायुती होणार की नाही याबाबत साशंकताच; पवार या वयात फिरत आहेत दु:ख वाटते – मेटे

Share
पुणे | प्रतिनिधी
निवडणुका जाहीर झाल्या, आचारसंहिता लागली तरीही महायुतीची घोषणा होत नाही  हे कशाचे लक्षण आहे?  भाजपला खरच युती करायची आहे का? असा प्रश्न शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे.
आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत दोन-तीन बैठका झाल्या. परंतु या बैठकांमध्ये महायुतीतील घटक पक्षांना विचारात घेतले नाही.. भाजपला खरच महायुती करायची असेल तर त्यांनी सर्वात आधी घटक पक्षांसोबत चर्चा केली पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही.
असे सांगत शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी भाजपवर निशाणा साधला.पुण्यातील जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरीत शिवसंग्राम पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पुण्यातील काही तरुणांनी शिवसंग्राम पक्षात प्रवेश केला.त्यानंतर विनायक मेटे बोलत होते.
मेटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी मित्रपक्षांची जागा वाटप होईल आणि त्यानंतर भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटल्या जातील असे सांगितले होते..पण तसे काही होताना आता दिसत नाही.. महायुतीत शिवसंग्राम पक्षाने १२ जागांची मागणी केली आहे.
यावर आम्ही मुख्यमंत्र्यांशीही बोलले आहोत मात्र ही चर्चा पुढे सरकत नाही. त्यामुळे युतीची चर्चा होत असताना भाजपने इतर घटक पक्षांनाही विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे मत विनायक मेटे यांनी व्यक्त केले.अन्यथा युती नाही झाली तरीही शिवसंग्रामही स्वतंत्र लढण्यास तयार आहे.युती झाली आणि युतीतील घटकपक्ष भाजप चिन्हावर लढले तर आम्हीही भाजप चिन्हावर लढू असेही विनायक मेटे यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांना या वयातही फिरावे लागते हे क्लेशदायक आहे
शरद पवार हे राज्याचे आणि देशाचे मोठे नेते आहेत..त्यांच्याविषयी सर्वांनाच आदर आहे. परंतु याही वयात त्यांना फिरावे लागते हे पाहून दुःख वाटते. असे मत शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले. पुण्यात आज शिवसंग्राम पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या कार्यक्रमानंतर मेटे यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. मेटे म्हणाले,  राष्ट्रवादीत स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या नेत्यांनी स्वतः जबाबदारी उचलून महाराष्ट्र पिंजून काढायला हवा होता.परंतु आज पाहिले तर शरद पवार स्वतः फिरताना दिसत आहेत..हे चित्र क्लेशदायक आहे, असे मेटे म्हणाले.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!