विखरणी : स्पर्धा परीक्षेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

0

विखरणी । वार्ताहर

स्पर्धा परीक्षा देताना अभ्यासाबरोबरच चिकाटी अन संयम महत्वाचा असतो सोबतच माहेरचा सत्कार अन कौतुक माझ्यासाठी कायमच स्फूर्ती देणारा असेल असे भावनिक उदगार प्रतिभा शेलार-कवडे यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या प्रतिभा शेलार, भारतीय सैन्यदलात निवड झालेले धनंजय गोडसे व रवींद्र शेलार यांचा यथोचित सन्मान आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी गावाकडून केलेला सत्कार ही आमच्यासाठी कधीही न विसरण्यासारखी गोष्ट आहे असे मत धनंजय गोडसे व रवींद्र शेलार यांनी व्यक्त केले.

विखरणी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, बाळासाहेब उशीर, ग्रामसेवक संघटनेचे रविंद शेलार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

माणूस कितीही मोठा झाला तरी तो गाव अन आईपेक्षा कधीही मोठा होऊ शकत नसल्याचे पंचायत समिती सदस्य मोहन शेलार म्हणाले. तरुण मुलांनी राजकारणाकडे न वळता स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी प्रयत्न करावा असा असे आवाहन बाळासाहेब उशीर यांनी केले. कधीही हाक द्या आम्ही सर्वजण कधीही तुमच्यामागे उभे आहोत असे प्रतिपादन रविंद्र शेलार यांनी केले.

कार्यक्रमाला सोपान पगार, दौलत शेलार, सुभाष शेलार, महेश बिडगर, यमाजी शेलार, अशोक बंदरे,नामदेव पगार, परसराम गोडसे, विष्णू गोडसे, रामदास शेलार, रवी शेलार, सुदाम शेलार, राजेंद्र शेलार, केशव पगार, विकास शेलार, गजानन शेलार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव पगार यांनी केले तर आभार पांडुरंग शेलार यांनी मानले.

LEAVE A REPLY

*