Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

‘महाराष्ट्र श्री-2019’ स्पर्धेत विकासला कांस्यपदक

Share

नाशिक । प्रतिनिधी

पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र श्री-2019 शरीर सौष्ठव स्पर्धेत येथील विकास हगवणे या शरीरसौष्ठव पटूंने कास्य पदक पटकावले.

महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असो. मान्यताप्राप्त रणजित बाबर यांच्या पुढाकाराने पुण्यातील श्री शिवाजी व्यायाम मंडळाच्या पटांगणांवर झालेल्या स्पर्धेत 130 सौष्ठवपटूंनी सहभाग नोंदवला.

त्यामध्ये विकासने 75 ते 80 किलो वजनी गटात आपल्या पिळदार व पुष्ट स्नायूंचे दर्शन घडवत कास्य पदकावर शिक्कामोर्तब करत नाशिकचे नाव उंचावले.

विकासला व्यायाम प्रशिक्षक सुनिल घरटे यांचे मार्गदर्शन लाभले. राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष वसंत गिते, जिल्हा संटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक सोनावणी, दिपक बागूल संजय तेजाळे, एजाज शेख, प्रशांत गायकवाड यांनी विकासचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

आता लक्ष एशियन स्पर्धा

या आधी मी अनेक बॉडीबिल्डींग स्पर्धेत पदके मिळवली आहे. मला राज्य पातळीवरून देश तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचे नाव उज्वल करण्याचा मानस आहे. त्यासाठी मी अत्यंत खडतर मेहनत घेत असून एशियन स्पर्धेत शरीर सौष्ठवाचे प्रदर्शन करुन मला पदक खेचून आणायचे लक्ष्य आहे. सुनिल घरटे आणि दीपक बागूल सर यांच्यासह नाशिकच्या संघटनेतील पदाधिकार्‍यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.

विकास हगवणे, सौष्ठवपटू

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!