Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

विजयी मिरवणुकांना बंदी; उल्लंघन केल्यास ऐन दिवाळीत ‘जेलवारी’

Share

नाशिक। प्रतिनिधी

विधानसभेची मतमोणी आज होत असून निकाल जाहिर होताच कार्यकर्त्यांचा जल्लोष होणार आहे. तर उत्साहाच्या भरात विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्याचा प्रयत्न होणार आहे. परंतु, जिल्हा प्रशासन व शहर पोलीस प्रशासनाने जमाव व शस्त्रबंदीचे आदेश जारी केले आहेत. यामुळे विजयी मिरवणुकांनाही बंदी करण्यात आली असून मिरवणुका काढण्याचा प्रयत्न करणारे तसेच अनुचित प्रकार घडण्यास कारणीभूत ठरणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यामुळे ऐन दिवाळीत कार्यकर्त्यांची जेलवारी होण्याची शक्यता आहे.

पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी आयुक्तालय हद्दीत जमाव बंदी व शस्त्र बंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आजपासून 6 नोव्हेंबर पर्यंत हे आदेश लागु असणार आहेत. या कालावधीत आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावरील जाणार्‍या गटातील व्यक्तिंचे वागणे, बिभत्स व अश्लिल हावभाव अथवा कृत्याबाबत आदेश देणे, ज्यामार्गाने जमाव जाईल अथवा जाणार नाही ती वेळ निश्चित करणे, सार्वजनिक ठिकाणी अगर सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी वापरावयाच्या लाऊड स्पिकरची वेळ, पद्धती, ध्वनीची तिव्रता, आवाजाची दिशा नियंत्रण करणे, रस्त्यावर सार्वजनिक जागेवर गाणी, संगीत ड्रम्स, ताशे, ढोल किंवा इतर वाद्ये, हॉर्न वाजवणे किंवा कर्कश्श आवाज करण्यावर नियंत्रण ठेवणेसाठी हे अधिकार स्थानिक अधिकार्‍यांना प्रदान करण्यात आले आहेत. आदेशाचा भंग करणारी व्यक्ती मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 134 नुसार शिक्षेस पात्र राहणार आहे.

विधासभा निवडणुकीचा निकाल, तसेच अगामी दिपावली सनाच्या पार्श्वभूमीवर हे शस्त्र व जमावबंदीचे आदेश काढण्यात आले आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर अतिउत्साही कार्यकर्त्यांकडून विजयी मिरवणुक काढली जाणार नाही तसेच काही अनुचीत प्रकार घडणार नाहीत यासाठी पोलीस यंत्रणा सजग असून सबंधीत सर्व उमेदवरांनाही सुचना देण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले.

पोलीसांचे युवकांना आवाहन

निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजा मध्ये फटाके वाजवणे ,गुलाल उधळणे,अर्वाच्य घोषणा देणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात. त्यामुळे वाद होऊन मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात.

त्याचे दुष्परिणाम नागरिकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात. आगामी दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तुरुंगाते जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही.भविष्य काळ खुप अंधारात जाईल. याची जाणीव असावी.

आतापर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात पण शांततेत पार पाडल्या व नाशिकच्या नावाला शोभेल असे सहकार्य केल्याबद्धल सर्व नाशिक करांचे शहर पोलीस दल आभारी आहे, याचप्रमाणेच मतमोजणी प्रक्रियाही शांततेत पार पाडू या… आणि कायदा सुव्यस्था राखुयात असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!