Type to search

नाशिक

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ प्रतिभावंत साहित्यिकांना सुमधुर स्वरातून आदरांजली

Share

नाशिक : प्रतिनिधी

प्रतिभावंत साहित्यिक सुधीर फडकेपु. ल. देशपांडे आणि वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांना समर्पित करत लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडच्या वर्धापन दिनानिमित्त लोकमान्य  परिवारातर्फे वेडात मराठे वीर दौडले सात’ हा मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाल गीतभक्तीगीतअभंगलावणी अशी एकाहून एक सरस गीते सादर करून बेळगावच्या गायकांनी रसिकांची मने जिंकली. नाशिकच्या दर्दी रसिकांनीही या गायकांना दाद दिली.

लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत रसिक रंजन निर्मितहा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजिका प्रेरणा बेळे व धनंजय बेळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 
नांदीने या बहारदार अशा मैफिलीची सुरुवात झाली.
त्यानंतर कौशल्याचा रामआकाशी झेप घेरे पाखरानाचरे मोराकुठे शोधीशी रामेश्वरथकले रे नंदलालाइंद्रायणी काठीएका तळय़ात होतीविकत घेतला शामप्रथम तुज पाहताकारे दुरावासखी मंद झाल्या तारकाम्यानातुन उसळेसर्वात्मका सर्वेश्वरा अशा गीतांचा नजराणा गायकांनी सादर केला.

कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्यची सांस्कृतिक चळवळ असलेल्या रसिक रंजनबेळगावकडून करण्यात आले. संकल्पना आणि निवेदन अनिल चौधरी यांचेसंगीत दिग्दर्शन श्रीधर कुलकर्णी यांचेतर भूमिका चैतन्य गोडबोलेश्रीवत्स हुद्दारअनुष्का आपटेअपेक्षा कडलेकाजल धामणेकर आणि तन्वी इनामदार यांनी केल्या. नारायण गणाचारीसंतोष गुरवॠषिकेश परांडे यांची साथसंगततर सुधीर शेंडेअंकिता कदम आणि अभिजित देशपांडे नाट्य समन्वयक होते. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!