Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मार्केट बझ मुख्य बातम्या

मारुतीची नवी अल्टो 800 कार लाँच

Share

मुंबई | वृत्तसंस्था

मारुती सुझुकीची अल्टो 800 या मॉडेलची नवीन आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी सादर केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मारुती नव्या अल्टो 800 ला बाजारात आणणार असल्याची चर्चा होती. अखेर नुकतीच अपडेटेड अल्टो 800 बाजारात दाखल झाली आहे.

अपडेटेड अल्टोमध्ये ग्राहकांना डिझाईन, अंतर्गत भाग आणि सुरक्षाविषयक फिचर्समध्ये बदल करण्यात आले आहेत. चालकाच्या बाजूने सुरक्षेसाठी विशेष एयर बॅगची सुविधा देण्यात आली आहे.

तसेच ईबीडी प्रणालीसह एबीएस सिस्टीम प्रदान केल्यामुळे रिअर पार्कींग सेन्सर, सिटबेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टीमचाही समावेश करण्यात आला आहे.

ही कार तीन प्रकारात ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात स्टँडर्ड आवृत्ती २.९४ लाख; स्टँडर्ड (ओ) २.९७ लाख; एलएक्सआय ३.५० लाख; एलएक्सआय (ओ) ३.५५ लाख आणि व्हीएक्सआय ३.७२ लाख रूपये अशा किंमतीत कार उपलब्ध आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!