शेतीच्या वादातून माजी उपसरपंचाचा मृत्यू; आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून माजी उपसरपंचाचा मृत्यू; आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून माजी उपसरपंचाचा मृत्यू; आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वडनेर भैरव | वार्ताहर

शेतीच्या वादातून चांदवड तालुक्यातील वडनेर वडनेर भैरव  येथे वयोवृद्ध माजी सरपंचाच्या मृत्यूप्रकरणी आठ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, वडनेर भैरव येथील खडकजांब रोडवर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी गट क्रमांक  ८७४ या वडिलोपार्जित जमीनीचा चांदवड न्यायालत दावा चालू असलेल्या शेतात बंडू विश्वनाथ पाचोकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर जमीन वहीती करत असताना त्यांना रोखण्यासाठी गेलेल्या माजी उपसरपंच फकीरराव नारायण पाचोरकर (वय ८०) यांच्या अंगावर ट्रक्टर घालून ठार केल्याचा मारल्याचा आरोप मयताची पत्नी रखमाबाई फकीरराव पाचोरकर यांनी फिर्यादीत केला.

नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान काल (दि. ०३) रोजी मृत्यू झाला. दरम्यान, नातेवाईकांनी गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता.

३०४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४९ प्रमाणे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज (दि. ४) रोजी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. पोलीस स्टेशनला असंख्य नातेवाईकांनी गर्दी केल्याने वाढीव पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आल्याने छावणीचे स्वरूप आले होते.

रखमाबाई फकीरराव पाचोरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडनेर भैरव खडकजांब रस्त्यालगत  गट नंबर ८७४ या वडिलोपार्जीत जमीनीचा चांदवड न्यायालत दावा चालू आहे.

नियमित बातम्या थेट आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी आमचे ‘टेलिग्राम चॅनल’ (Telegram) जॉईन करा

दावा प्रलंबित असून निकाल लागलेला नसतानाही जमिनीवर शेतीची मशागत करण्यासाठी शनिवारी (दि.२३) दुपारी १२:३० वाजता आले होते.

म्हणून मी व माझे  पती त्यांना समजण्यास गेलो असताना अजून आपल्या दाव्याचा निकाल लागलेला नाही म्हणून आपण शेतीची मशागत करू नका अशी चर्चा करत असताना ट्रक्टर चालक रोशन बंडू पाचोरकर याने फकीरराव पाचोरकर यांच्या कमरेवर व पायावर ट्रक्टर चालविल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बंडू विश्वनाथ पाचोरकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर, सुरेश विश्वनाथ पाचोरकर, हरी बंडू पाचोरकर,प्रतिक सुरेश पाचोरकर,गोकुळ सुरेश पाचोरकर,अलका बंडू पाचोरकर, आशा सुरेश पाचोरकर यांनी शिवीगाळ करून ओढताड केली.

याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकही संशयिताला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपविभागीय अधिकारी रेड्डी मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव तपास करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com