Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

आज उद्धव ठाकरेंचा ‘शाही’ शपथविधी; व्यासपीठाला मराठा साम्राज्याचे कोंदण

Share

मुंबई | प्रतिनिधी

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शाही शपथविधी सायंकाळी शिवतीर्थावर पार पडणार आहे. शपथविधीसाठी दिग्गज नेत्यांची आज मुंबईत मांदियाळी बघायला मिळणार आहे. डोळे दिपवणारा शाही सोहळयाचे साक्षीदार होण्यासाठी स्टेजदेखील तसाच सजविण्यात आला आहे. मराठा साम्राज्याचे कोंदण या स्टेजला असणार आहे. शिवसेना नेते अनिल देसाई यांच्यावर हा स्टेज बनविण्याचे जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यात महिन्याभराच्या सत्तानाट्यानंतर अखेर आज (दि. 28) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत . अवघा देश या क्षणाची अतिशय उत्कंठेने प्रतीक्षा करत आहे.

त्यानिमित्ताने देशालाच काय तर जगाला महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेचे दर्शन घडणार आहे. 140 बाय 50 फुटांचे भव्यदिव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून त्यावर 300 आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे .

शिवतीर्थावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यासमोरच तब्बल 6 हजार चौरस फुटांचे भव्यदिव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे . शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शपथविधीपूर्वी क्रेनच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत .

व्यासपीठ तीन भागांत विभागण्यात आले आहे . राज्यपाल, महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती , शिवसेना , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते यांची शपथविधी सोहळ्याला उपस्थिती असणार आहे . त्यादृष्टीने व्यासपीठ तीन भागांमध्ये विभागण्यात आले आहे.

व्यासपीठावरील शपथविधी सोहळा प्रत्येकाला पाहता यावा यासाठी 20 एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत . तसेच प्रमुख पाहुणे आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी एक प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे.

राज्यभरातून येणाऱ्या जनतेला शिवतीर्थावर प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वारांमधून प्रवेश दिला जाणार आहे , तर शपथविधी सोहळा संपल्यानंतर एका प्रवेशद्वारातून सोडले जाणार आहे. दरम्यान , शिवतीर्थ सज्ज ठेवण्यासाठी शेकडो कामगार राबत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले .

या शपथविधी सोहळ्यासाठी सुमारे एक हजार वाहनांमधून शिवसैनिक येण्याची शक्यता आहे . त्यादृष्टीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे . नेतेमंडळी , अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी शिवाजी पार्क येथे पार्किंगची सोय असणार आहे , तर राज्यभरातून येणाऱ्या मोठय़ा बसेससाठी सेनापती बापट मार्गावर व्यवस्था असेल . तसेच कोहिनूरच्या मागेही पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे .

दूरदर्शनवर थेट प्रेक्षपण

मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून या शपथविधी सोहळ्याचे सायंकाळी 6 . 30 वाजल्यापासून थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे . सॅटेलाइटद्वारे हा शपथविधी सोहळा संपूर्ण देशात पाहता येणार आहे .


असा आहे पोलीस बंदोबस्त

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलीस दलातर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे . कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक पोलीस ठाण्याचा बंदोबस्त , सशस्त्र  दल , राज्य राखीव पोलीस बल , दंगल नियंत्रण पथक , जलद प्रतिसाद पथक , बॉम्बशोधक पथक , मुंबई वाहतूक विभाग तसेच 2000 अतिरिक्त पोलीस अधिकारी व अंमलदार असा तगडा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे . गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार असून साध्या वेशातील पोलीसही तैनात राहणार आहेत . तसेच वाहतुकीचा अडथळा होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस आवश्यक खबरदारी घेणार आहेत .

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!