Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

स्थायी समिती सभापतीपदी उद्धव निमसे बिनविरोध; सेनेला दोन उपसभापतीपदे

Share

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी उद्धव निमसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.  १६ पैकी भाजपचे सर्वाधिक ९ सदस्य असल्यामुळे कालच निमसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन सभापती निवड बिनविरोध केली. पीठासन अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकरी सुरज मांढरे यांनी कामकाज बघितले.

यामुळे भाजपच्या ९ सदस्यामध्ये सेनेच्या चार सदस्यांची भर पडली. यामुळे निवडणूकीत जवळपास एकूण १६ पैकी १३ सदस्य युतीचे झाले.

शिवसेनेच्या कल्पना पांडे यांनी देखील अर्ज सादर केला होता मात्र ऐनवेळी पांडे यांनी माघार घेतल्याने निमसे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, माजी महापौर अशोक मुर्तडक आजच्या सभापती निवड प्रक्रियेला गैरहजर होते. त्यामुळे अनेक तर्क वितर्कांसह चर्चेचा विषय महापालिकेत झाला होता.

सेनेची उपसभापतीपदावर बोळवण

आजच्या निवडणुकीत शिवसेनेकडून कल्पना पांडे यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेत भाजपला साथ दिली. यामुळे सभापदीपदाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. मात्र, प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार सेनेला कमी महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या आरोग्य आणि विधी समितीचे उपसभापतीपद देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!