Type to search

आवर्जून वाचाच सेल्फी

धम्माल लगोरी, भन्नाट धोपकेल

Share

छोट्यांनो, खेळ कायमच आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग राहिले आहेत. भारत बुद्धिबळासारख्या खेळाचे उगमस्थान आहे. कौरव-पांडव द्युत खेळायचे. सध्याच्या स्मार्टफोनच्या जगात खेळणे विसरून गेलेल्या तुम्हा मुलांना आधीच्या पिढ्यांचे खेळ फारसे माहीत नाहीत. चला तर मग अशाच काही भन्नाट खेळांची ओळख करून घेऊ या.

लगोरी : काही भागात पिठ्ठू म्हणून ओळखला जाणारा हा खेळ खेळताना भारी मजा येते. कितीही खेळाडू हा खेळ खेळू शकतात. यासाठी सात सपाट दगडांची गरज भासते. ते एकमेकांवर रचायचे असल्याने खालचा मोठा, त्यावरील छोटा, त्यावरील आणखी छोटा असे निवडावे लागतात.

खाली सर्वात मोठा दगड ठेवून त्यावर इतर दगड ठेवायचे असतात. अर्थातच छोटा दगड सर्वात वर असतो. ही झाली तुमची लगोरी. हा खेळ खेळण्यासाठी दोन संघ लागतात. खेळाडूंची दोन संघांमध्ये विभागणी केल्यानंतर एकाने ही लगोरी मोडायची असते. दुसरा संघ तिचे रक्षण करतो. रक्षण करणार्‍या संघाने मोडलेली लगोरी रचायची असते. दुसरा संघ त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडत असतो.

धोपकेल : धोपकेल हा आसाममध्ये लोकप्रिय असणारा कबड्डीसारखा खेळ आहे. रबरी बॉलने खेळायचा खेळ म्हणजे धोपकेल. यात दोन संघ असतात. मैदानाच्या एका भागात उभा असणारा संघ बॉल दुसर्‍याच्या कोर्टमध्ये फेकतो.

प्रत्येक संघ आपल्या एका खेळाडूला दुसर्‍याच्या कोर्टमध्ये पाठवतो. त्याने आपल्या संघाने फेकलेला बॉल झेलून पुन्हा कोर्टमध्ये परतायचे असते. प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूचा स्पर्श होऊ द्यायचा नसतो.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!