Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

ओझर येथे युवकाची आत्महत्या; सुकेण्यात रेल्वेच्या धडकेत युवक ठार

Share

ओझर | वार्ताहर

येथील आरके कॉलनीत रहाणाऱ्या युवकाने घरातील लोखंडी अँगलला कपडयाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली
याबाबत माहिती अशी की, आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास वृषिकेश केदू तूपलोंढे (वय २१, रा आरके कॉलनी ओझर) याने त्याचे रहाते घरातील छताच्या लोखंडी अँगलला फेटयाचा कपडा बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली घटनेची माहिती मिळताच ओझर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला मृतदेह पिंपळगांव बसवंत येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी  पाठविण्यात आला. याबाबत ओझर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार अंबादास गायकवाड करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत मौजे सुकेणे शिवारात रेल्वेच्या धडकेने युवक ठार झाल्याची घटना घडली. अधिक माहिती अशी की, आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास गोरख रघूनाथ कंक ( २५ ) राहणार मौजे सुकेणे हा रेल्वेचौकी गेट नं ९६ च्या रुळ ओलांडतांना मुंबई कडे जाणाऱ्या रेल्वेची धडक बसली.

हा युवक मुंबईकडून मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वेवर धडकल्याने त्याच्या डोक्यास व हातापायास जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताचे वृत्त समजताच ओझर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळगांव बसवंत येथील शासकीय रुग्णालयात पाठविला. याबाबत ओझर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हवालदार बापू आहेर हे करीत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!