गतिरोधकावर दुचाकी आदळली; दोन ठार, दोन जखमी

0

नाशिक | गिरणारे नाशिक रस्त्यावरील आभाळाची वाडीनजीक महादेवफाटा पुलाजवळ दुचाकी गतिरोधकावर आदळल्याने दोघांचा ट्रकखाली सापडून मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरधाव दुचाकीवर जात असताना गतीरोधाकाचा अंदाज न आल्याने दुचाकी जोरात आदळून दोघे दुचाकीच्या मागे रस्त्यावर कोसळले. दोघेही युवक रस्त्यावर मध्यभागी पडल्याने मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली आले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला असून गोटिराम शेवरे (२४ रा. खरवळ, हरसुल), त्रंबक राऊत (२५, काकडदरी, हरसुल) यांचा मृत्यू झाला तर कैलास माळेकर २० व पाडुरंग टोपले हे दोघे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ट्रकची तोडफोड केली. घटनेची माहिती पोलिसांना समजताच नाशिक शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरण हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी ट्रक जाळण्यापासून ग्रामस्थांना रोखले तसेच ट्रक घटनास्थळावरून हलविला.

प्रसंगावधान राखत गावात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. जखमी आणि दोन्ही मयतांचे मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

LEAVE A REPLY

*