उद्यापासून नाशकात ‘अखेर स्वामीजी इष्टस्थळी पोहेचले’ दोन दिवसीय व्याख्यानमाला

0

नाशिक : प्रतिनिधी 

देशभरात १२ जानेवारी हा दिवस युवादिन म्हणून साजरा केला जातो. सोबतच यंदा स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो सर्वधर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषणाला १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने लोकमान्य मल्टीपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीकडून ‘अखेर स्वामीजी इष्टस्थळी पोहेचले’ या विषयावर दोन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी व्याख्यान देणार आहेत. दिनांक १२ आणि १३ जानेवारी रोजी दुपारी साडे चार वाजता हे व्याख्यान त्र्यंबकरोड जवळील जलशुद्धीकरण केंद्रालगत असलेल्या अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या शिकागो शहरात ११ सप्टेंबर १८९३ रोजी झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणातून जगाला भारताची ओळख झाली.

मात्र, या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर पोहोचण्यासाठी स्वामी विवेकानंद यांना अनेक अडचणी आणि अडथळे पार करावे लागले.

यामागे मोठी विलक्षण अशी कथा आहे. हीच कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या व्याख्यानाला नाशिककरांनी उपस्थित राहावे असे आवाहन लोकमान्य परिवाराकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*