Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मोमीनपुरा भागात गावठी कट्ट्यासह दोघे ताब्यात

Share
नाशिक | दिवाळी निर्विघ्न पार पडावी यासाठी ठिकठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीस पहारा देत आहेत. गुन्हे शाखेकडून गस्त घालत धडक कारवाई केली जात असून काल रात्री मालेगाव शहरातील मोमिनपुरा भागात गावठी कट्ट्यासह दोघांच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश आले आहे.

काल (दि.०६) रात्री मालेगाव शहरात ऑलऑऊट ऑपरेशनदरम्यान खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे मोमीनपुरा भागात काही संशयितांकडे गावठी कट्टा असून ते मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असल्याचे समजले.

त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोमिनपुरा भागात सापळा रचून मोहम्मद शोएब शौकत हुसेन (वय २२, रा. मोमीनपुरा, एकतारा बिल्डींग मालेगाव), मोईन मोहम्मद अनिस (वय २४, रा. अख्तराबाद, मालेगाव या संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, होंडा कंपनीची शाईन दुचाकी हस्तगत केली. दरम्यान, गावठी कट्टा शहजाद डी. रा. मिल्लत मदरसा जवळ याच्याकडून घेतल्याचे समोर आले असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.

याप्रकरणी दोघा संशयितांवर भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल व गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अहिरे, पोलीस हवालदार राजू मोरे, वसंत महाले,सुहास छत्रे, राकेश उबाळे, देवा गोविंद, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज पठाण, रतिलाल वाघ, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!