Photo Gallery : ब्रह्मगिरीच्या तिसऱ्या फेरीसाठी भाविक त्र्यंबकमध्ये दाखल; गर्दी वाढणार

0

त्र्यंबकेश्वर (देवयानी ढोन्नर) | तिसऱ्या श्रावण सोमवारच्या ब्रम्हगिरी प्रदिक्षणेकरिता  रविवारी सायंकाळी  भाविक  दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे.

गत काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी गर्दीत घट झालेली दिसून येत आहे. शहरातील बस स्थानक संत गजानन महाराज संस्थान समोरील नवीन बस स्थानक येथे हलविण्यात आल्या आहेत.

दुपारपासून खंबाळा येथे खासगी वाहने थांबविण्यात आली होती. भाविक बसने प्रवास करत होते, मात्र संख्या कमी होती. सायंकाळी सहा वाजेनंतर नंतर कुशावर्तावर स्नानासाठी गर्दी होऊ लागली.

मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासनाने ४ ते ५ लाख भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला असून याठिकाणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

सायंकाळपर्यंत एस टी बसला प्रतिसाद संथ मिळत होता. केवळ एस टी बसचा प्रवास हा एकमेव पर्याय उपलब्ध असल्यामुळे अनेक बसेस रिकाम्याच धावत होत्या. मात्र, रात्री गर्दी वाढल्याने भाविकांनी बसस्थानकावर मोठी गर्दी केली आहे.

पुर्वी नाशिक ञ्यंबक रस्ता अरूंद होता तेव्हा वाहने नादुरूस्त झाल्यास वाहतुकीचा खोळंबा होत असायचा.  सन 1997 ते 1999 दरम्यान, वारंवार हा अनुभव आल्याने खंबाळा येथे खासगी वाहने उभी  करण्याचा  पर्याय निवडण्यात आला होता.

सन 2015 मध्ये सिंहस्थपुर्व येथे चारपदरी रस्ता झाला आहे. त्र्यंबक शहराच्या असापास पेगलवाडी आणि परिसरात  वाहने उभी करता येतील अशा जागा देखील उपलब्ध असल्यामुळे 14 किलोमीटर आधीच पार्किंगची गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्त्यावर अनावश्यक बॅरेकेटींग आणि दुर अंतरावरचे पार्कींग यामुळे यावर्षी भाविकांनी पाठ फिरवली असावी असा अंदाज लावला जात आहे.

LEAVE A REPLY

*